Thursday, July 4, 2024

Latest Posts

NEET UG Paper Leak Scam: PM Narendra Modi युद्ध थांबवतात, पण त्यांना पेपरफुटी थांबवता येत नाही, Rahul Gandhi यांची खोचक टीका

NEET आणि UGC-NET पेपर लीक (NEET UG Paper Leak Scam) झाल्याचा मुद्दा आता चांगलाच गरम झाला आहे. यावर आता काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (गुरुवार, २० जून) पत्रकार परिषद घेत भाष्य केले.

NEET आणि UGC-NET पेपर लीक (NEET UG Paper Leak Scam) झाल्याचा मुद्दा आता चांगलाच गरम झाला आहे. यावर आता काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (गुरुवार, २० जून) पत्रकार परिषद घेत भाष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर भाष्य करत ते म्हणाले, “नरेंद्र मोदी युद्ध थांबवतात, असा दावा केला जातो, पण त्यांना पेपरफुटी थांबवता येत नाही किंवा त्यांना पेपरफुटी थांबवायची इच्छा नाही.”

पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, “‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान हजारो विद्यार्थ्यांनी पेपरफुटीच्या तक्रारी केल्या होत्या. आता देशात NEET आणि UGC-NET चे पेपर लीक झाले आहेत. नरेंद्र मोदी युद्ध थांबवतात, असा दावा केला जातो, पण त्यांना पेपरफुटी थांबवता येत नाही किंवा त्यांना पेपरफुटी थांबवायची इच्छा नाही. व्यापम घोटाळा मध्य प्रदेशात झाला, ज्याचा नरेंद्र मोदी देशभर गाजावाजा करत आहेत. पेपरफुटीचे कारण म्हणजे भाजपने संपूर्ण यंत्रणा काबीज केली आहे. जोपर्यंत ही पकड पूर्ववत होत नाही तोपर्यंत पेपरफुटी सुरूच राहणार आहे. पेपर फुटणे ही राष्ट्रविरोधी कृती आहे कारण त्यामुळे तरुणांना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे पेपरफुटीला जबाबदार असणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.”

राहुल गांधी पुढे म्हणाले,”आज एका संस्थेने शिक्षण व्यवस्था काबीज केली आहे. प्रत्येक पदावर ते स्वतःचे लोक नियुक्त करतात. आपल्याला ही व्यवस्था उलटवायची आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात लिहिले होते. पेपरफुटीनंतर कारवाई करण्याबरोबरच पेपर गळती रोखण्यासाठी यंत्रणा नव्याने तयार करणेही अत्यंत गरजेचे आहे. दबाव आणून विरोधक या दोन गोष्टी सरकारकडून करून घेण्याचा प्रयत्न करतील.”

“भारतात अनेक प्रामाणिक लोक आहेत. प्रामाणिक लोकांना काम दिल्यास पेपर फुटणार नाही. पण तुमच्या विचारसरणीशी संबंधित लोकांना काम सोपवलं तर पेपर फुटेल. गुणवत्तेच्या आधारे नोकऱ्या दिल्या नाहीत, अपात्र लोकांना कुलगुरू बनवले आणि त्यांच्याच विचारसरणीच्या लोकांना परीक्षा रचनेत सामावून घेतले, तर पेपर फुटतील. पेपरफुटीचे कारण म्हणजे भाजपच्या पालक संघटनेने संपूर्ण यंत्रणा वेठीस धरली आहे. परिणामी पूर्वी ज्या संस्था निःपक्षपाती होत्या, त्या आता एका विचारसरणीने चालवायला लागल्या आहेत. या संस्थांमध्ये अपात्र लोकांना स्थान देण्यात आले आहे.”

हे ही वाचा

Police Bharti 2024: उमेदवारांची राहण्याची सोय करा, Nana Patole यांची गृहमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे मागणी

आता शेतकऱ्याची आर्थिक विवंचना होणार दूर; Bacchu Kadu यांनी दिला ‘हा’ निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss