Nepal Aircraft Crash, ७२ जणांसह नेपाळचे विमान धावपट्टीवर कोसळले, बचाव कार्य सुरू

आज सकाळच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान कोसळले . हा अपघात भीषण होता. पाळच्या पोखरामध्ये सुमारे ७२ जणांना घेऊन काठमांडूला हे विमान चालले होते.

Nepal Aircraft Crash, ७२ जणांसह नेपाळचे विमान धावपट्टीवर कोसळले, बचाव कार्य सुरू

आज सकाळच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान कोसळले . हा अपघात भीषण होता. पाळच्या पोखरामध्ये सुमारे ७२ जणांना घेऊन काठमांडूला हे विमान चालले होते. आणि ते रन वेवर कोसळले. मध्य नेपाळमधील शहरातील जुन्या आणि नवीन विमानतळांदरम्यान कोसळलेल्या विमानात ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. सर्व प्रवाश्याना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत.

नेपाळमध्ये या विमानाचा अपघात झाल्यानंतर आगीचे लोट आणि मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येतांना दिसत आहेत. त्यामुळे बचावकार्य करताना अडचणी येत असल्याचं दिसतेय. खराब हवामान असल्यामुळे हे विमान एका टेकडीवर आदळले. यानंतर त्यात स्फोट होऊन आग लागली. आगीमुळे लोकांना बाहेर काढण्याच्या कामात अडचणी येत आहेत. अपघाताचे ठिकाण नदीजवळ असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु हवामान खराब असतानाही यती एअरलाइनच्या एटीआर-72 विमानाने उड्डाण केल्याचं समोर आले आहे. पायलट कॅप्टन कमल केसी हे विमान उडवत होते. पोखरा येथील सेती खोच येथे हे विमान कोसळले असून त्यानंतर विमानाला आग लागली. यती एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितले की, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्य वेगात सुरु आहे. अनेकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. तसेच पोलीस, विमान प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनीही मदतकार्य सुरू केलं आहे. दरम्यान, बचावकार्य सुरू असल्याने तूर्तास एअरपोर्ट बंद करण्यात आलं आहे. तसेच या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

हे कायद्याचं राज्य आहे, कोयत्याच नाही!, भाजपने केली जोरदार पोस्टरबाजी

सरकारमध्ये निवडणुका लावण्याची हिंमत नाही, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version