Nepal Yeti Airlines Plane Crash, लँडिंगच्या अवघ्या १० सेकंदापूर्वीच प्लेन झाले क्रॅश

आज सकाळच्या सुमारास नेपाळमधील पोखरा येथे यति एअरलाईन्सचे विमान क्रॅश झाले. नेपाळच्या पोखरामध्ये सुमारे ७२ जणांना घेऊन काठमांडूला हे विमान चालले होते.Nepal Yeti Airlines Plane Crash, लँडिंगच्या अवघ्या १० सेकंदापूर्वीच प्लेन झाले क्रॅश

Nepal Yeti Airlines Plane Crash, लँडिंगच्या अवघ्या १० सेकंदापूर्वीच प्लेन झाले क्रॅश

आज सकाळच्या सुमारास नेपाळमधील पोखरा येथे यति एअरलाईन्सचे विमान क्रॅश झाले. नेपाळच्या पोखरामध्ये सुमारे ७२ जणांना घेऊन काठमांडूला हे विमान चालले होते. आणि ते रन वेवर कोसळले. मध्य नेपाळमधील शहरातील जुन्या आणि नवीन विमानतळांदरम्यान कोसळलेल्या विमानात ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. यति एअरलाइन्सचे एटीआर-72 विमान पोखरा विमानतळावर पोहोचण्याच्या अवघ्या १० सेकंद आधी हा अपघात झाला. आता पर्यंत या दुर्घटनेत ४० लोकांनाच मृत्यू झाला आहे.

नेपाळमधील पोखरा विमानतळ चीनच्या मदतीने उभारण्यात आले आहे. त्याच्या उभारणीसाठी चीनच्या एक्झिम बँकेने नेपाळला कर्ज दिले होते. १ जानेवारी २०२३ रोजी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. या विमानाचा अपघात झाला तेव्हा यति एअरलाइन्सचे विमान धावपट्टीपासून अवघ्या १० सेकंदाच्या अंतरावर हे विमान होते. एटीसी कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पोखराची धावपट्टी पूर्व-पश्चिम दिशेला बांधलेली आहे. विमानाच्या पायलटने आधी पूर्वेकडून उतरण्याची परवानगी मागितली होती आणि परवानगी मिळाली होती, पण काही वेळातच वैमानिकाने पश्चिमेकडून उतरण्याची परवानगी मागितली आणि पुन्हा परवानगी मिळाली. नागरी उड्डाण प्राधिकरणाचे म्हणणे आहे की लँडिंगच्या आधी विमानात ज्वाळा दिसत होत्या, त्यामुळे खराब हवामानामुळे हा अपघात झाला असे म्हणता येणार नाही.

या अपघाताच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारने सोमवारी राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे . मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय या विमान अपघाताच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नेपाळच्या यति एअरलाईन्सचं विमान आज सकाळी कोसळलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पोखरा परिसराजवळ विमान दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनाग्रस्त विमानात ७२ जण होते. यामध्ये ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबरचा यामध्ये समावेश आहे. विमान अपघात झाला आणि तातडीने बचाव कार्य सुरु झाले. आता पर्यंत या अपघातात जवळपास ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर या विमान अपघातामध्ये पाच भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. संजय जायसवाल, सोनू जायसवाल, अनिल कुमार राजभर, अभिषेक कुशवाह आणि विशाल शर्मा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

Sharad Pawar Live : शरद पवारांच्या हस्ते महाराष्ट्र केसरीचा सत्कार

Makar Sankranti 2023 , संक्रांतीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट

शुभम गिलचे शतक तर विराट कोहलीने ठोकले अर्धशतक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version