भैया-अंकल ऐकून वैतागलेल्या कॅब ड्रायव्हर जुगाड पाहून नेटकरी झाले आश्चर्यचकित

मी प्रत्येक ड्रायव्हरला फक्त "ड्रायव्हर सर" म्हणतो कारण मी ते एकदाच केले आणि कॅब ड्रायव्हर भारावून गेला

भैया-अंकल ऐकून वैतागलेल्या कॅब ड्रायव्हर जुगाड पाहून नेटकरी झाले आश्चर्यचकित

सोहिनी एम या ट्विटर वापरकर्त्याने कारच्या सीटचे छायाचित्र पोस्ट केले आहे, ज्यामध्ये उबर चालकाने ( Uber Driver) गाडीच्या सीटमागे लिहिलेली सूचना दिसत आहे. पुढच्या सीटच्या मागे लिहिले आहे की, “डोन्ट कॉल मी भैया अँड अंकल”. ड्रायव्हरच्या या विनोदबुद्धीने नेटकऱ्यांची मने पूर्णपणे जिंकली आहेत आणि उबर चालकाच्या या सुचनेबाबत इंटरनेटवर चर्चा देखील सुरू झाली आहे.

काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ड्रायव्हरचे त्याच्या अलौकिक कल्पनेबद्दल कौतुक केले, तर काहीजण ड्रायव्हरला कसे संबोधित करायचे याचा विचार करताना गोंधळले आहेत. तर काहींनी स्वतःचे काही मजेशीर किस्से कमेंट सेक्शनमध्ये मांडले आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले “मजेची गोष्ट म्हणजे ते भैय्या लोकांचे भाया आहेत, सोबो आणि दक्षिण दिल्लीच्या लोकांना हे माहित असेलच.” दुसर्‍याने टिप्पणी अशी होती की, “मी प्रत्येक ड्रायव्हरला फक्त “ड्रायव्हर सर” म्हणतो कारण मी ते एकदाच केले आणि कॅब ड्रायव्हर भारावून गेला कारण २० वर्षात त्यांना कोणीही सर म्हटले नाही, आणि त्याने मला काही मिनिटे याबद्दल सांगितले.” तर तिसर्‍याने लिहिले, “मी नेहमीच लोकांना बॉस म्हणण्यात बिझी असतो!”

वायरल ट्वीटला उत्तर देताना उबर म्हणाले, “कॅब चालकाला संबोधित करण्यासाठी तुम्ही ॲपचा वापर करू शकता.”

हे असे पहिल्यांदाच घडत नाहीये जेव्हा उबर किंवा उबर चालक चर्चेत आले आहेत. या पूर्वी देखील एकदा दिल्लीत राहणाऱ्या रिया कासलीवाल यांनी मुसळधार पावसात उबर चालकाला कॅब घेऊन बोलावले असतानाच्या त्यांच्या संवादाचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

या स्क्रीनशॉटमध्ये असे ठळक दिसून येत होते की, रिया यांनी कॅब चालकाला मेसेज पीक करायला येणार का असे विचारले असता, कॅब चालकाने, “क्या करू, मन नही है” असे उत्तर दिले होते.

हे ही वाचा:

‘कॅन्सर होऊनही नेतृत्वाने साधी चौकशी केली नाही’, यामिनी जाधवांचा उद्धव ठाकरेंवर निशाण

विदुषकही फिका पडेल अशा करामती करणाऱ्या ओटर या प्राण्याच्या व्हिडिओ होतोय व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version