Sunday, July 7, 2024

Latest Posts

शेतकऱ्यांसाठी नवी खुश खबर ; पंतप्रधानांनी आणली ‘ही’ योजना

शेतात राबतो शेतकरी बाप नाही त्याच्या संकटाना माप

शेतात राबतो शेतकरी बाप
नाही त्याच्या संकटाना माप

भारत (India) हा शेतीप्रधान देश आहे. जगाचा पोशिंदा म्हंटल की शेतकरी डोळ्यासमोर येतो. शेतकऱ्याला आस्मानी , सुलतानी अशा सर्व संकटांना सामोरे जावे लागते. आतापर्यंत प्रत्येक सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवं व त्याला मदत होईल अशी आखणी केली आहे. हरित क्रांती (Green Revolution ) हा ही एक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विकासासाठी केलेली एक उपाययोजनाच होती. त्यातूनच नंतर पुढे अनेक गोष्टी घडल्या तंत्रयुग आले आणि शेती हा तांत्रिक व्यवसाय झाला. त्यांनतर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा गंभीर विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी नियोजित केलेली नवी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) होय. यातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत होत्या. या आत्महत्यांना रोखण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना आखल्या गेल्या. त्याच सोबत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ व सुभत्तता मिळावी यासाठी पंतप्रधान मोदी यांनीसुद्धा काही नव्या योजना सुरू केल्या. त्यांनी आपल्या १० वर्षीय कारकिर्दीत शेतकऱ्यांचे प्रश्न पूर्ण होतील यावर त्यांनी मोठ्याप्रमाणावर काम केले आहे. त्यापैकीच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना.

या योजनेच्या माध्यमातून केंद्रसरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६००० रुपयांची आर्थिक मदत करत असते. हे हफ्ते चार महिन्यांच्या फरकाने दिले जातात. आतापर्यंत एकंदरीत या सन्मान निधीचे १६ हफ्ते झाले आहेत. लवकरच १७ वा हफ्ता पूर्ण केला जाणार आहे. परंतु हा हफ्ता मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांनी काही महत्वपूर्ण कामे करणे गरजेचे आहे. ही काम पूर्ण करण्यासाठी शेतकर्त्यांकडे केवळ ११ दिवस उरले आहेत. या शेवटच्या आठवड्यातील हफ्त्या बाबत अजून अधिकृत माहिती आलेली नाही. परंतु जूनच्या शेवटच्या आठवड्यात पुढील हफ्ता येण्याची शक्यता वरतवली जात आहे.

१७ वा हफ्ता मिळवण्यासाठीची चार महत्वपूर्ण कामे :

१. ५ ते २० जून ई केवायसी (KYC) अपडेट करणे गरजेचे आहे.
२. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला अर्ज करावा.
३. त्यांनतर पोर्टलवर जमिनीचा तपशील अपलोड करावा.
४. त्यांनतर बँक खाते आधारशी लिंक करावे
हा हफ्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्याची शक्यता आहे. त्या आधीच ही सर्व कामे शेतकऱ्यांनी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.

ही योजना २४ फेब्रुवारी २०१९ रोजी शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात प्रत्येकी तीन वेळा २००० रुपये पाठवले जातात. हे पैसे शेतकऱ्याला डीबिटी द्वारे पाठवण्यात येतात. यातील प्रत्येक हफ्ता चार महिन्याने येतो.आता फेब्रुवारी पासून पुढील चार महिने जून मध्ये संपत आहे.

हे ही वाचा:

सहाय्यक उपनिरीक्षक पदभरती साठी अर्ज करायचा आहे तर, जाणून घ्या संपूर्ण पद्दती..

CAREER निवडताय ? मग ‘या’ गोष्टींचा होईल फायदा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss