Saturday, August 31, 2024

Latest Posts

विवाहित दांपत्यांसाठी आली नवी खुशखबर ; केला मोठा निर्णय जाहीर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार अनेक नवनवे निर्णय व घोषणा त्याचप्रमाणे नव्या योजना आखल्या आहे. सरकारतर्फे विवाहित दांपत्यांसाठी सुरू केलेल्या कन्यादान योजने मधील रकमेमध्ये आजच्या शासन निर्णयानुसार वाढ करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत आता या विवाहित दांपत्यांना चांगली रक्कम दिली जाणार आहे.

ही  योजना नक्की आहे तरी काय ? 

सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दांपत्यांसाठी अर्थसाहाय्यक- कन्यादान योजना या योजनेअंतर्गत आतापर्यंत नवविवाहित दांपत्यांना अनुदान म्हणून २०,००० रुपये एवढी रक्कम व विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्सानात्मक अनुदान म्हणून ४००० रुपये देण्यात येत होते. या योजनेमध्ये १८ जुलै रोजी बदल करून ही रक्कम वाढवण्यात आलेली आहे २० मे २०२३ रोजी पालघर येथे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळा दरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती या रकमेमध्ये वाढ करून दांपत्यांना चांगली रक्कम दिली जाणार आहे.

माननीय मुख्यमंत्री यांनी २० मे २०२३ रोजी पालघर येथील सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणारा दांपत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात २५ हजार रुपयापर्यंत वाढ करण्याबाबतची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागाअंतर्गत शुभमंगल सामूहिक नोंदणी कृती विवाह योजना अंतर्गत नव विवाहित दांपत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात २५ हजार व सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना २५०० एवढे प्रोत्सहात्मक अनुदान देण्यास १३ मार्च २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आदिवासी विकास विभाग सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याणभाग तसेच इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचे समावेश विवाहित योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानात महिला व बालविकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे.

अधिकृत शासन निर्णय संकेतस्थळ :

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407181706187934.pdf

ही रक्कम कशी मिळेल ?

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संदर्भात क्रमांक एक मध्ये नमूद शासन निर्णयामध्ये सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या मागासवर्गीत दांपत्यांना वस्तू रुपात देण्यात येणार अनुदानाची रक्कम वधूचे वडील किंवा पालकांच्या अधोरेखित धनादेशाद्वारे लग्नाच्या दिवशी देण्यात यावे अशी तरतूद आहे.

आता त्यात बदल करून अनुदानाच्या रक्कम थेट डीबीटी पद्धतीने लाभार्थ्यांच्या हि रक्कम जमा केली जाणार आहे, हा शासन निर्णय १८ जून २०२४ रोजी पारित केला असून हा शासन निर्णय खालील दिलेल्या लिंक Kanyadan Yojana 2024 वरून तुम्ही डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या वाचू शकता तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता.

हे ही वाचा:

घटस्फोटाची घोषणा करत HARDIK PANDYA यांनी केले चाहत्यांना आवाहन

Navi Mumbai NH 3: ॲक्सेस कंट्रोल मार्गामुळे शहरातून बाहेर पडण्यासाठी लागणार फक्त १५ मिनिटे, शहरांतर्गत वाहतूक आता होणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss