भारतीयांसाठी नवीन बाजारपेठ खुली होणार ,नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या फ्रान्स दौऱ्यावर गेले आहेत. फ्रान्स दौरा झाल्यानंतर ते लगेचच UAE साठी रवाना होणार होते. फ्रान्स दौऱ्यानंतर आता युएई (UAE) साठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहाटे संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

भारतीयांसाठी नवीन बाजारपेठ खुली होणार ,नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या फ्रान्स दौऱ्यावर गेले आहेत. फ्रान्स दौरा झाल्यानंतर ते लगेचच UAE साठी रवाना होणार होते. फ्रान्स दौऱ्यानंतर आता युएई (UAE) साठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहाटे संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. संयुक्त अरब अमिराती ते राष्ट्रपती शेख बिन जायद यांची भेट घेतील. युएईसाठी रवाना होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, माझा युएई दौरा आमच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीतील एका नवीन अध्यायाची सुरुवात करेल. दहशतवादाच्या (terrorism) विरोधातील लढाईत भारत आणि फ्रान्स एकत्र असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं. ते फ्रान्समध्ये बोलत होते. आपल्या सीमेपलीकडील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कठोर कारवाईची गरज आहे असल्याचे मत दोन्ही देशांच्या नेत्यांनी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील केली. आणि त्यांनी विविध विषयांवर मुद्दे मांडले.

दहशतवादाच्या विरोधातील लढाईसाठी आणखी पावले उचलण्याचे दोन्ही देशाने मान्य केल्याचे पंतप्रधान म्हणाले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याची भारत आणि फ्रान्सची विशेष जबाबदारी असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. कोरोनाचे संकट आणि युक्रेनमधील युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. याचा विशेषतः ‘ग्लोबल साउथ’ देशांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. ही चिंतेची बाब असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अशा समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक आहे. भारत शाश्वत शांततेसाठी योगदान देण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.तसेच पंतप्रधानांच्या या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांनी UPI संदर्भात करार करण्यात आला आहे. त्यामुळे आता भारतीयांना फ्रान्समध्ये UPI द्वारे रुपयात पैसे देता येणार आहेत. याची सुरुवात आयफेल टॉवरपासून होणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. या करारामुळे भारतीय नवनिर्मितीसाठी एक मोठी नवी बाजारपेठ खुली होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सच्या या दौऱ्यामध्ये फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने म्हणजेच ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन (Emmanuel Macron ) यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक देखील पार पडली आहे. राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन यांच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, ‘फ्रान्स हा संपूर्ण जगात मानवतेसाठी ओळखला जातो. तसेच फ्रान्समध्ये येऊन अभिमान वाटत असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं.

हे ही वाचा:

Immunity booster साठी या हेल्दी ड्रिंक्स तुम्हाला ठेवतील स्ट्रॉंग

Shiv Chhatrapati राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, ३ वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version