Registration Certificate साठी नव्या Technology चा पहिल्यांदाच होणार वापर

कोठेही वाहन चालवताना आरसी बुक हे अनिवार्य असते. आरसी (Rc) म्हणजे वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र.

Registration Certificate साठी नव्या Technology चा पहिल्यांदाच होणार वापर

कोठेही वाहन चालवताना आरसी बुक हे अनिवार्य असते. आरसी (Rc) म्हणजे वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र. वाहनधारक वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मागील दीड ते दोन महिन्यांपासून प्रतीक्षा करत होते. मात्र आता वाहनधारकांची वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्याची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यामुळे १ जुलैपासून स्मार्ट कार्ड (Smart card) उपलब्ध होणार आहे असे सांगण्यात आले आहे. कर्नाटकातील एका कंपनीसोबत परिवहन मंडळाने स्मार्ट कार्डच्या निर्मितीसाठी करार केला असून कर्नाटकातील या कंपनीद्वारे १ जुलै २०२३ रोजी स्मार्ट कार्डचा पुरवठा करण्यात येणार आहे. हे स्मार्ट कार्ड नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे बनविण्यात येणार असून अनेक अपडेटेड गोष्टी आपल्याला या स्मार्ट कार्डवर नव्याने पाहता येणार आहे. नव्या स्मार्ट कार्डवर पहिल्यांदाच लेझर तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जाणार आहे.

नवे स्मार्ट कार्ड आता लवकरच वाहनधारकांना मिळणार असून यात अनेक बदल करण्यात आले आहेत. २००६ सालापासून परिवहन विभागातर्फे कागदी आरसी बुक अथवा परवाना देणे रद्द केले होते. तसेच कागदी परवाना च्या ऐवजी स्मार्ट कार्डचा वापर केला जात आहे. हे स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी आधी हैदराबाद येथील एका कंपनीशी करार करण्यात आला होता. मात्र आता या कंपनीशी केलेला करार हा संपला असल्याने त्यामुळेच स्मार्ट कार्डचा काही अंशी तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे वाहनधारकांना साधारण दीड ते दोन महिने वाहन परिवहन आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्राची प्रतीक्षा करावी लागत होती. पूर्व नागपूर आरटीओ (Rto) कार्यालयातून ज्या वाहनधारकांना परवाना अथवा आरसी बुकची आवश्यकता आहे त्यांना तश्याच संबंधित कागदपत्रांची तपशीलवार माहितीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. परिवहन विभागाने नव्या स्मार्ट कार्डच्या निर्मितीसाठी कर्नाटकातील एका कंपनीशी करार केला आहे. या कंपनीचे नाव एमसीटी कार्ड अँड टेकनॉलॉजि प्राव्हेट लिमिटेड (MCT CARD & TECHNOLOGY PRIVATE LIMITED) असे आहे. या कंपनी कडून १ जुलै रोजी स्मार्ट कार्डचा पुरवठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे . या कंपनीने नुकतीच सात कोटींची अनामत रक्कम बँकेत जमा केली असल्यामुळे हा अंदाज वर्तवला जात आहे.

नव्या स्मार्ट कार्डवर अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नव्या स्मार्ट कार्डवर अवयवदानाचा कॉलम देण्यात आला आहे. नव्या वाहन परवान्यावर आवयवदान करण्याची परवानगी आहे अथवा नाही याबद्दल कॉलम देण्यात आला आहे. त्यामुळे अपघातात ब्रेन डेड (brain dead) झालेल्या अनेकांकडून अवयवदानाची संख्या वाढण्याचा अंदाज आपल्याला मिळू शकतो म्हणून ही तरतूद या नव्या स्मार्ट कार्डवर करण्यात आली आहे. त्याचबरोबर नव्या स्मार्ट कार्डवर लेझरचा वापर पहिल्यांदाच होणार आहे. त्यामुळे लायसन्सवर (license) लेझरच्या सहाय्याने नाव व फोटो छापण्यासाठी लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. त्यामुळे यावर उत्कृष्ट दर्जाचा फोटो छापले जाण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेकडून जाहिरातबाजी : कोणता नेता आहे अधिक लोकप्रिय ?

आजचे राशिभविष्य, १३ जून २०२३ , आजचा दिवस…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version