ज्ञानवापी मशिदी मध्ये नवा ट्विस्ट, न्यायालयाचा निर्णय ‘या’ दिवशी लागणार

ज्ञानवापी मशिदी मध्ये नवा ट्विस्ट, न्यायालयाचा निर्णय ‘या’ दिवशी लागणार

ज्ञानवापी प्रकरणी मोठा निर्णय कोर्टा कडून देण्यात आला आहे. आता ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. वाराणसी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सोमवारी अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीचे दिवाणी दाव्यांविरुद्धचे आव्हान फेटाळून लावले, ज्ञानवापी मशिदीचे शीर्षक आणि आजूबाजूच्या जमिनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. वाराणसी जिल्हा न्यायालयानं हिंदू पक्षकाराच्या बाजून निकाल देत सुनावणी होणार असल्याचं सांगितलं आहे. ज्ञानवापी प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने मुस्लीम पक्षकाांची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षकारांची भूमिका योग्य असल्याचा निष्कर्ष वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला आहे. मुस्लीम पक्षकारांची या प्रकरणी सुनावणी न करण्याची मागणीही फेटाळण्यात आली आहे.

जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी हा निकाल दिला. यावेळी हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन आणि विष्णू जैन यावेळी उपस्थित होते. याशिवाय लक्ष्मी देवी, रेखा आर्या आणि मंजू व्यास या ५ पैकी ३ फिर्यादी देखील कोर्टात पोहोचल्या होत्या. केवळ ४० पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना या सुनावणीवेळी प्रवेश मिळाला होता. इतर लोकांना कोर्टामध्ये प्रवेश देण्यात आलेला नव्हता. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणावर जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणी निकाल देताना कोर्टानं म्हटलं की, या वादावर सुनावणी केली जाईल. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ तारखेला होणार आहे. न्यायालयाने सांगितले की राखी सिंह विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य केस न्यायालयात चालविण्यायोग्य आहे. अश्या पद्धतीने कोर्टाने प्रतिवादी करणाऱ्या अंजुमन इनजतिया मशीद कमिटीचा अर्ज फेटाळला आहे.
कोर्टाच्या सुनावणी नंतर याचिकाकर्ते सोहनलाल आर्य यांनी पत्रकारानंशी सवांद साधतांना असे म्हटले कि, ज्ञानवापी मंदिराची ही पायाभरणी आहे, हा तमाम हिंदूंचा विजय आहे. कोणी कायदा वेवस्था बेगडनण्याचा प्रयत्न करू नका. सर्वांना शांतता राखण्याचे आव्हान त्यांनी केला आहे.

हे ही वाचा :

बीडमधील परळीची ओळख असलेली चिमणी जमीनदोस्त

लम्पी आजारांपासून जनावरांना वाचवण्यासाठी राज्य शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा ; नाना पटोले

Exit mobile version