spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

UPI चा नवा नियम, आता करता येणार ५ लाखांपर्यंत डिजिटल पेमेंट

एनपीसीआयच्या नव्या नियमानुसार आता कर भरण्यासाठी यूपीआयच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंत ट्रॅन्जेक्शन करता येणार आहे. रुग्णालयाचे बिल, शैक्षणिक संस्थांची फी, आयपीओ आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट स्कीम्स या सारख्या व्यवहारासाठी आता ५ लाख रुपयांचे यूपीआय ट्रॅन्जेक्शन करता येईल.

सगळीकडे देशात यूपीआय ट्रान्सजेक्शनचे प्रमाण वाढले आहे. सध्या स्मार्टफोनचे प्रमाण वाढल्यामुळे यूपीआय ट्रॅन्जेक्शनच्या प्रमाणातही वाढ झालेली दिसून येते. आजकाल प्रत्येकजण छोटे-मोठे आर्थिक व्यवहार तसेच पैसे ट्रान्सफर करण्यासाठी यूपीआयचा वापर करत आहेत. एखाद्या मोठ्या दुकानापासून ते रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या दुकानापर्यंत प्रत्येकजण यूपीआय पेमेंटसाठी क्यूआर कोड लावलेला असतो. मात्र यूपीआयचे व्यवहार करण्यासाठी लिमिटचे बंधन असते. हा अनेकांसाठी अडचणींचा विषय ठरत होता. वारंवार अनेक जणांकडून तक्रारी येत होत्या. त्यावर आता नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला असून १६ सप्टेंबरपासून यूपीआयच्या रोजच्या व्यवहारात वाढ करण्यात आली आहे.

नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार १६ सप्टेंबरपासून अनेक भागांत यूपीआय ट्रान्सजेक्शनच्या मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ८ ऑगस्ट रोजी आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली होती. या बैठकीनंतर यूपीआयमध्ये विशिष्ट श्रेणींसाठी प्रति व्यवहार मर्यादा वाढवण्याची आवश्यकता बऱ्याच दिवसांपासून जाणवत होती. आता या बाबतचा निर्णय घेण्यात आला असून एनपीसीआयने सर्व यूपीआय ऍप, पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स तसेच बँकांना याबाबत माहिती दिली आहे. सर्वानी आपल्या सिस्टीममध्ये अपडेट करावे अशी सूचनाही यूपीआयने केली आहे.

एनपीसीआयच्या नव्या नियमानुसार आता कर भरण्यासाठी यूपीआयच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंत ट्रॅन्जेक्शन करता येणार आहे. रुग्णालयाचे बिल, शैक्षणिक संस्थांची फी, आयपीओ आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट स्कीम्स या सारख्या व्यवहारासाठी आता ५ लाख रुपयांचे यूपीआय ट्रॅन्जेक्शन करता येईल. सध्या एनपीसीआयने एकाच खात्यावरून अनेक लोकांना व्यवहार करण्याची सोय यूपीआय सर्कलच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss