spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Niagara Falls पूर्ण गोठला, हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

Niagara Falls : संपूर्ण अमेरिकेत (america) कोल्ड वॉर (cold war) सुरु आहे असे दिसून येत आहे. याच महत्वाचे कारण म्हणजे बर्फाने सर्व अमेरिकेत उच्छाद मांडलाय आहे. देशात सगळीकडे थंडी वाढली असली, तरी थंडीचा जास्त त्रास हा अमेरिका वासियांना सहन करावा लागतोय. संपुर्ण अमेरिकेत बर्फाचं-बर्फ (ice frozen) दिसून येत आहे. अमेरिकेतील रहिवासींना जमीन देखील दिसत नाही. पाणी पिण्याच्या नळातून देखील बर्फ येतोय. यामुळे कित्येक जणांचा मृत्यू झालाय, तर काही जण जखमी झालेत. वीजपुरवठा (electricity) बंद झालेला आहे. अमेरिकेची अवस्था हि हतबल झाली आहे. बफेलोमध्ये (buffalo) कित्येकजणांचा मृतदेह हा चक्क रस्त्यांवर पडलेला आढळला आहे. या भीषण परिस्थितीचे फोटोस आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यातील एक व्हिडीओ काहीसा सुखद व थक्क करणारा आहे. सोशल मीडियावर सध्या नायगारा धबधब्याचा (Niagara Falls) बर्फाने गोठलेला व्हिडीओ तुफान ट्रेंड होत आहे. नायगाराचा भव्य धबधबा हा बर्फवृष्टीमुळे गोठला आहे.

आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की नायगाराच्या गोठलेल्या धबधब्यातही काही भागात पाणी वाहत आहे. या नायगारा धबधब्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भन्नाट वायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय कि संपूर्ण पाणी हे गोठलंय. मात्र धुक्यामुळे धबधबा वाहतानाच अचानक थांबल्याचे दिसत आहे. बर्फाच्या चादरीखालून पाणी वाहत असल्याची माहिती नायगारा पार्क वेबसाईटवर देण्यात आली आहे. नायगारा फॉल्स न्यूयॉर्क स्टेट पार्कनुसार, दर सेकंदाला सुमारे ३२ फूट प्रति सेकंद वेगाने ३, १६० टन पाणी नायगारा फॉल्सवरून वाहते. नायगारा फॉल्स हा नायगारा घाटाच्या दक्षिणेकडील तीन धबधब्यांचा एक समूह आहे, जो कॅनडातील ओंटारियो प्रांताच्या सीमेवर पसरलेला आहे. नायगारा हा जगातील मोठ्या धबधब्याच्या नोंदींच्या यादीत येतो.

हा विरळ विडिओ @KCAESCON230 या ट्विटर अकाउंट वरून पोस्ट केलाय. अधिकुत व्हिडिओ वायरल करणारे म्हणतो कि कॅलिफोर्नियातील मुलांसाठी हा एक मनोरंजक (entertainment) आणि वास्तविक आर्क्टिक अनुभव होता. दरम्यान, विशेषतः थंड हिवाळ्यात फॉल्सच्या पायथ्याशी नायगारा नदीवर वारंवार बर्फ गोठतो. ज्यामुळे इथे जणूकाही एक “बर्फाचा पूल” बनतो. ४ फेब्रुवारी १९१२ रोजी पोस्टनुसार, बर्फ वितळून नदीत पडल्याने तीन लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर थंडीत अधिकाऱ्यांनी लोकांना बर्फाच्या पुलावरून चालण्यास बंदी लावली आहे. तूर्तास तुम्हाला हे नायगारा धबधब्याचे नेत्रदीपक दृश्य कसे वाटते हे कमेंट करून नक्की कळवा.

हे ही वाचा:

अधिवेशनाचा आज ९ वा दिवस, अनेक ठराव, प्रस्तावावर शिक्कामोर्तब?

मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा काँग्रेस पक्षाची सत्ता आणू, नाना पटोले यांचं मोठं विधान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss