Wednesday, July 3, 2024

Latest Posts

Nilesh Lanke यांनी घेतली इंग्रजीमधून शपथ, Sujay Vikhe यांना अप्रत्यक्ष टोला

कालपासून विधानसभेचे अधिवेशन सुरु झाले झाले असून महाराष्ट्रातील सर्वच खासदार आणि मंत्री दिल्लीला शपथविधीसाठी उपस्थित राहिले आहे.

कालपासून (२४ जून) लोकसभेचे अधिवेशन सुरु झाले झाले असून महाराष्ट्रातील सर्वच खासदार आणि मंत्री दिल्लीला शपथविधीसाठी उपस्थित राहिले आहे. अठराव्या लोकसभेचे हे अधिवेशन कालपासून जरी सुरु झाले असले तरी पहिले तीन दिवस शपथ विधी सोहळा चालणार आहे. काल पंतप्रधानांनी शपथ घेतली. त्यानंतर आज सकाळी ११ वाजल्यापासून खासदारांचा शपथविधी सुरु झाला. आज सकाळपासून महाराष्ट्रातील नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, प्रतिभा धानोरकर, गोपाळ पाडवी, सुरेश म्हात्रे, प्रणिती शिंदे, शोभा बच्छाव, बळवंत वानखेडे, नागेश पाटील, विशाल पाटील आणि निलेश लंके यांनी शपथ घेतली.

महाराष्ट्रातील खासदार मुख्यतः मराठीतून शपथ घेत आहेत, परंतु आज निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांच्या विरोधात भाजपचे सुजय विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. प्रचारादरम्यान त्यांनी निलेश लंके यांच्यावर टीका करत ‘लोकसभेत इंग्रजी बोलणारा, समजणार खासदार हवा’ असे वक्तव्य भर सभेत केले होते. त्यानंतर निलेश लंके यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाला. आणि आता आज संसद भवनात शपथविधी सोहळ्यादरम्यान निलेश लंके यांनी चक्क इंग्रजीमधून शपथ घेत सुजय विखेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

हे ही वाचा

Amol Mitkari यांनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे, Pravin Darekar यांचा इशारा

Nita Ambani at Chaat Shop: आलू टिक्कीचा आस्वाद आणि अनोखी काशी पाहून मी…Nita Ambani काय म्हणाल्या?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss