Saturday, July 6, 2024

Latest Posts

Nita Ambani at Chaat Shop: आलू टिक्कीचा आस्वाद आणि अनोखी काशी पाहून मी…Nita Ambani काय म्हणाल्या?

अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचा मुख्य सोहळा शुक्रवारी १२ जुलैपासून सुरू होणार आहे. लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांना पारंपारिक भारतीय पोशाख अशी थीम असणार आहे.

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. आता त्यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) या वाराणसी पोहोचल्याचं पाहायला मिळालं. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी नीता अंबानी या काशी विश्वनाथ मंदिरात गेल्या होत्या. तिथे त्यांनी पूजा पाठ केले तसेच भगवान शिव यांना लग्नाच्या पत्रिका अर्पण केली. त्यानंतर नीता अंबानी यांनी वाराणसी मधील प्रसिद्ध चाटच्या दुकानाला भेट दिली. नीता अंबानी यांनी टमाटर चाट आणि आलू टिक्कीचा आस्वाद घेतला.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत आणि सून राधिका यांचे लग्न ठरले आहे. त्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी नीता अंबानी बाबा विश्वनाथ यांच्या दरबारात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी काशी विश्वनाथ आणि गंगा मातेचे आशीर्वाद घेतले. तसेच गंगा आरतीमध्ये सहभाग घेतला. काशी विश्वनाथ धाम येथील दर्शन आणि पूजा आटोपल्यानंतर नीता अंबानी या काशी चाट भंडारला पोहोचल्या. नीता अंबानी यांच्यासोबत प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा सुद्धा होते. माध्यमांशी संवाद साधताना नीता अंबानी म्हणाल्या की, मी दहा वर्षांनी वाराणसीमध्ये आले आहे. काशी विश्वनाथ कॉरिडोरची भव्यता पाहून मला खूप आनंद झाला आहे. आता काशी पूर्णपणे बदलली आहे.

अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचा मुख्य सोहळा शुक्रवारी १२ जुलैपासून सुरू होणार आहे. लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांना पारंपारिक भारतीय पोशाख अशी थीम असणार आहे. रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. राधिका मर्चंट ही एनकोर हेल्थकेअरची सीईओ वीरेंद्र मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. अनंत आणि राधिका यांच्या लग्नापूर्वीचा सोहळा २०२४ च्या सुरुवातीला गुजरात येथील जामनगर मध्ये मोठा उत्साहात पार पडला होता. त्यानंतर त्यांचा लग्नापूर्वीचा अजून एक कार्यक्रम २९ मे ते १ जून यादरम्यान क्रूजवर आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आता मोठ्या धामधूममध्ये होणार असलेल्या १२ जुलैच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा

वचन देते की, मी देशाच्या निस्वार्थ सेवेच्या….काय म्हणाल्या Varsha Gaikwad?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss