मुलाच्या प्री वेडिंग सोहळ्यात नीता अंबानी यांनी केले पारंपारीक भारतीय नृत्य

देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे.

मुलाच्या प्री वेडिंग सोहळ्यात नीता अंबानी यांनी केले पारंपारीक भारतीय नृत्य

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Party : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांची प्री-वेडिंग फंक्शन्स जोरात सुरू आहेत. हे फंक्शन्स गुजरातमधील जामनगरमध्ये १ मार्चपासून सुरू झाले आहेत. या तीन दिवसीय सोहळ्यात जामनगरमध्ये देश-विदेशातील बड्या व्यक्तींसह बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्सची जणू जत्राच भरली असल्याचे चित्र दिसत आहे. तर या संपूर्ण सोहळ्यात अनेक डान्स परफॉर्मन्स हे झाले पण या मधील नृत्याने सर्वांचीच मन जिंकून घेतली आहेत.

या सोहळ्यात नीता अंबानी यांनी एक नृत्य सादर केले आहे. “या देवी सर्वभूतेषु विद्या-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥” या मंत्राने नीता अंबानी यांच्या नृत्याची सुरुवात झाली. त्यानंतर “विश्वंभरी अखिल विश्व तनी जनेता विद्या धरी वदनमा वसजो विधाता” या भजनावर पारंपारीक भारतीय नृत्य त्यांनी केले. या समारंभाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत. त्यांच्या पारंपारिक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्या नृत्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दिलजीत दोसांझ याच्या गाण्याने समारंभात धूम मचाली. त्याने स्टेजवर भांगडा केला. तसेच दिलजीत दोसांझ याने करीना कपूर-सैफ अली आणि करिश्मा कपूर सोबत डान्स केला. नीता अंबानी यांच्या व्हिडिओवर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. काही तासांत हजारो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. गायक दिलजीत दोसांझ यांचा नीता अंबानी यांनी गुजराती भाषेतून क्लास घेतला. नीता अंबानी सिंगर दिलजीत दोसांझ यांना विचारते,’केम चो’, तो दिलजीतने उत्तर दिले ‘माजा मां’ त्यावर प्रेक्षक चांगलेच खूश होतात. या सह अनेक मजेशीर आणि आनंददायी प्रसंग या सोहळ्यात पाहायला मिळाले आहेत. तसेच या संपूर्ण सोहळ्याचे व्हिडिओ देखील तुफान व्हायरल होत आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या या समारंभात देश-विदेशातून दिग्गज आले होते. या समारंभासाठी प्रथमच जामनगरमध्ये १६० आंतरराष्ट्रीय विमानांमधून विदेशी पाहुणे आले होते. अन्यथा जामनगर विमानतळावर दिवसातून पाच ते दहा विमाने उडत होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग बॅशचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्री-वेडिंग सेरेमनीच्या दुसऱ्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मोठा मुलगा आकाश अंबानी, सून श्लोका मेहता आणि मुलगी ईशा अंबानी यांचे लूकही चर्चेत होते.

हे ही वाचा:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडीदेवीचे CM Eknath Shinde यांनी घेतले दर्शन

‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version