Nobel Peace Prize 2022: नोबेल शांतता पुरस्काराची झाली घोषणा.. पहा कुणाला मिळाला या वर्षीचा नोबेल पुरस्कार

तब्बल ३४३ लोक नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत असताना यावेळी मानवाधिकार गटांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Nobel Peace Prize 2022: नोबेल शांतता पुरस्काराची झाली घोषणा.. पहा कुणाला मिळाला या वर्षीचा नोबेल पुरस्कार

प्रतिष्ठित नोबेल शांतता पारितोषिक दरवर्षी अशा व्यक्ती किंवा संस्थांना दिले जाते जे जागतिक शांतता आणि वैश्विक मानवी बंधुत्वाला प्रोत्साहन देतात. याच पार्श्वभूमीवर यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आला. २०२२ चा नोबेल शांतता पुरस्कार बेलारशियन मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील, अॅलेस बायलियात्स्की तसेच रशिया आणि युक्रेनमधील मानवी हक्कांसाठी असलेल्या संस्थांना देण्यात आला. युक्रेन आणि रशिया यांच्यातील भीषण युद्धाच्या काळात शांततेसाठी काम करणाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. तब्बल ३४३ लोक नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत असताना यावेळी मानवाधिकार गटांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

बेलारूसमधील प्रख्यात मानवाधिकार कार्यकर्ते एलेस बेलियात्स्की, रशियाची मानवाधिकार संघटना, युक्रेनची मेमोरियल अँड ह्युमन राइट्स ऑर्गनायझेशन, सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज (Centre for Civil Liberties) यांची २०२२ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीने याची अधिकृत घोषणा केली आहे.

यावेळी नोबेल समितीने स्पष्ट केले की नोबेल समिती अशा व्यक्ती आणि संस्थांना शांतता पुरस्कार देईल ज्यांनी लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याच्या अधिकाराबद्दल शिक्षित करणे, प्रश्न विचारण्याच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार करणे आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे यासाठी कार्यक्रम हाती घेतले आहेत.

समितीने म्हटले आहे की शांतता पुरस्कार विजेत्यांनी युद्धांना आळा घालण्यासाठी काम केले आहे. नोबेल समितीने गुन्ह्यांच्या नोंदी, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि सरकारी अराजकता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांचे कौतुक केले. शांतता आणि लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी ते सामील झाल्याचे सांगण्यात आले.

हे ही वाचा:

Goodbye : ‘गुडबाय’ला बायकॉट करा’; हिंदुस्तानी भाऊची मागणी…

अकासा एअरलाईन्सची नवी भेट, प्रवाशांना पाळीव प्राणी सोबत घेऊन जाता येणार आहे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version