spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Nobel Prize : स्वीडनचे शास्त्रज्ञ स्वांते पाबो यांना नोबेल पुरस्कार जाहीर

नोबेल पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली असून स्वीडनचे शास्त्रज्ञ स्वांते पाबो (Svante Paabo) यांना यंदाच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेल (Nobel Prize in Medicine) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

नोबेल पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली असून स्वीडनचे शास्त्रज्ञ स्वांते पाबो (Svante Paabo) यांना यंदाच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेल (Nobel Prize in Medicine) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. लुप्त झालेल्या होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीमधील जीनोम (for his discoveries concerning the genomes of extinct hominins and human evolution) संबंधित अभ्यासाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

विज्ञान जगतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो, तो स्वीडनच्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या नोबेल असेंब्लीद्वारे हा प्रदान केला जातो. स्वंते पाबो एक स्वीडिश जेनेटिस्ट (Geneticist)आहेत जे उत्क्रांती अनुवांशिकतेमध्ये तज्ञ आतहे. पॅलेओजेनेटिक्सच्या संस्थापकांपैकी एक म्हणून, त्यांनी निएंडरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे.

 स्वीडनचे स्वांते पाबो हे एक जेनेटिस्ट (Geneticist) असून ते मानवी उत्क्रांतीसंबंधी संशोधन करतात. ते पॅलिओजेनेटिक्सच्या संस्थापक शास्त्रज्ञांपैकी एक असून त्यांनी निअँन्डरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणात संशोधन केलं आहे. त्यांच्या नावाची घोषणा करताना नोबेल पुरस्कार समितीने म्हटलं आहे की, आपल्या संशोधनातून स्वांते पाबो यांनी असं काही केलं आहे की जे या आधी अशक्य समजलं जायचं. निअँन्डरथल जीनोमचा क्रम ठरवणे हे त्यांचे मोठं संशोधन आहे. निअँन्डरथल जीनोम सध्या लुप्त झालं आहे. स्वांते पाबो यांनी होमिनिन डेनिसोवा यासंबंधितही संशोधन केलं आहे.

होमिनिन्स जीन्स सध्या झालेले आहेत. पण त्यांचे हस्तांतर होमो सेपियन्समध्ये झाल्याचा शोध स्वांते पाबो यांनी लावला आहे. जुन्या जीन्सचे आताच्या पीढीपर्यंत हस्तांतर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हा पुरस्कार अशा वेळी देण्यात आला आहे जेव्हा कोविड महामारीमुळे सर्वांचे लक्ष वैद्यकीय संशोधनाकडे वळले आहे. या घोषणेनंतर मंगळवारी भौतिकशास्त्राचे नोबेल, बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्याचे नोबेल पारितोषिक दिले जाणार आहे. नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा शुक्रवारी होणार असून अर्थशास्त्र पुरस्काराची घोषणा १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.

हे ही वाचा:

१०८MP कॅमेरा आणि ६GB RAM सह Moto G72 झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Sukh Mhanje Nakki Kay Asta : गौरी – जयदीपच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss