spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नोकियाचा नवा अविष्कार : ५,००० पेक्षा कमी किंमतीचा आणि 4G मोबाईल भारतात लॉन्च

भारतात दिवसेंदिवस नवनवीन मोबाईल लॉन्च होत असतात. त्यात आता नोकियाने नवा अविष्कार केला आहे. नोकिया २६६० फ्लिप हा फोन ३०+OS वर काम करतो. यात 4G लाईट कनेक्टिव्हिटी आहे. QQVGA रिझोल्यूशनसह २.८ इंचाचा प्राथमिक डिस्प्ले आणि १.७७ इंचाचा बाह्य डिस्प्ले देखील आहे. हा फोन Unisoc T १०७ SoC ने सुसज्ज आहे. Nokia २६६० फ्लिपची किंमत आणि वैशिष्ट्ये प्रत्येक तपशील जाणून घ्या.

नोकिया २६६० फ्लिपची भारतात किंमत ४,६९९ रुपये आहे. ही त्याच्या ४८MB RAM आणि १२८MB स्टोरेज वेरिएंटची किंमत आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, सध्या ते नोकियाच्या वेबसाइटवर ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचा : 

फिल्मफेअर पुरस्कार २०२२ : विजेत्यांच्या नावाची यादी आली समोर

नोकिया २६६० फ्लिप या मोबाईलमध्ये ड्युअल-सिम (नॅनो) सह येतो. यात ४G कनेक्टिव्हिटी सपोर्ट आहे. ही फ्लिप फोन मालिका 30+ OS वर काम करते. यात QVGA रिजोल्यूशनसह २.८ इंचाचा प्राथमिक डिस्प्ले आणि QQVGA रिझोल्यूशनसह १.७७-इंचाचा डिस्प्ले आहे. हे Unisoc T107 SoC ने सुसज्ज आहे. यात 48MB रॅम आणि १२८MB इनबिल्ट स्टोरेज आहे. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे ३२GB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये LED फ्लॅशसह ०.३मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे.

कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, Nokia २६६० Flip मध्ये ब्लूटूथ v४.२सपोर्ट, मायक्रो-USB २.०पोर्ट आणि ३.५ mmऑडिओ जॅक आहे. हे २.७w चार्जिंग सपोर्टसह काढता येण्याजोग्या बॅटरीसह सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की एका 4G सिमवर हा फोन जास्तीत जास्त २४ दिवस टिकू शकतो. त्याच वेळी, सिंगल 4G सिमसह, ते जास्तीत जास्त ६ तासांचा टॉकटाइम देण्यास सक्षम आहे. अशा पद्धतीचा हा नवा नोकियाचा मोबाईल आहे.

शीतयुद्ध संपवण्यात महत्त्वाचा वाटा असलेले मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन

Latest Posts

Don't Miss