spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आता iPhone 14 देखील असणार ‘मेड इन इंडिया’, भारतात लवकरच सुरू होणार उत्पादन

ॲपलने (Apple) भारतात आपला फ्लॅगशिप आयफोन 14 तयार करण्यास तयारी दाखवली आहे.

ॲपलने (Apple) भारतात आपला फ्लॅगशिप आयफोन 14 तयार करण्यास तयारी दाखवली आहे. कंपनीने पुष्टी केली आहे की ही उपकरणे तामिळनाडूतील श्रीपेरुंबदुर येथील कॉन्ट्रॅक्ट-निर्माता फॉक्सकॉनच्या कारखान्यात भारतात तयार केली जातील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेड-इन-इंडिया iPhone 14 येत्या काही दिवसांत स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात होईल. भारतात उत्पादित होणारे फोन भारतीय बाजारपेठ आणि निर्यात दोन्हीसाठी असतील. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अॅपलने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही iPhone 14 भारतात तयार करण्यास उत्सुक आहोत.”

सध्या अॅपलकडे ३ जागतिक भागीदार आहेत- विस्ट्रॉन, फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉन. भारतातही याच कंपन्या आयफोन असेंबल करतात. विशेष म्हणजे अॅपल दीर्घकाळापासून आयफोनचे उत्पादन चीनबाहेर पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.

विश्लेषकांच्या मते, Apple २०२५ पर्यंत चीनबाहेर Macs, iPads, Apple Watch आणि AirPods चे उत्पादन २५ टक्क्यांनी वाढवण्याची योजना आखत आहे.

क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथे मुख्यालय असलेल्या ॲपलने २०१७ मध्ये iPhone SE सह भारतात iPhones बनवण्यास सुरुवात केली. आज, Apple देशातील काही सर्वात प्रगत iPhone बनवते, ज्यात iPhone SE, iPhone 12, iPhone 13 आणि आता iPhone 14 यांचा समावेश आहे.

Apple ने ७ सप्टेंबर रोजी iPhone 14 सीरीज आणि प्रो सीरीजमध्ये एकूण ४ iPhone लाँच केले आहेत. iPhone 14 ची किंमत ७९,९९० रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या सर्वात महाग iPhone Apple iPhone 14 Pro Max (1TB) मॉडेलची किंमत १,८९,९०० रुपये आहे.

iPhone 14 ची रचना iPhone 13 सारखीच आहे. यात ६.१-इंचाची सुपर रेटिना XDR स्क्रीन आहे. फोनमध्ये नवीनतम A15 बायोनिक चिप आणि मजबूत बॅटरी आहे. याशिवाय iPhone 14 मध्ये १२-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, iPhone 14 मध्ये 12-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. त्याचबरोबर कनेक्टिव्हिटीसाठी हँडसेटमध्ये वायफाय, जीपीएस आणि ब्लूटूथ सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

मराठा समाजावर गरळ ओकणाऱ्या तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, काँग्रेस आक्रमक नाना पटोले

36 Gunn : संतोष जुवेकरच्या मुख्य भूमिकेतील नव्या चित्रपटाचे पोस्टर आऊट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss