Sunday, June 30, 2024

Latest Posts

International Day Against Drug 2024: पालघर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी Say No To Drugs – Yes To Life घेतली शपथ

अंमली पदार्थाचे सेवन एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कसे दुष्परिणाम करतात, तसेच एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य कसे बिघडू शकते याबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी दिनी विविध कार्यक्रम राबवले जातात.

आज (दि.२६ जून २०२४) हा दिवस ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ (International Day Against Drug) म्हणून पाळला जातो. अंमली पदार्थाच्या व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांचे जीवन वाचवणे आणि जागरूकता करणे हा या दिवसामागचा मूळ उद्देश आहे. ह्या दिवशी अंमली पदार्थाचे सेवन एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कसे दुष्परिणाम करतात, तसेच एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य कसे बिघडू शकते याबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी दिनी विविध कार्यक्रम राबवले जातात.

२६ जून रोजी अंमली पदार्थ विरोधी दिना निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय पालघर जिल्हा, जिल्हा परिषद पालघर, जिल्हा मानसोपचार तज्ञ डॉ. अमोल भुसारे, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे पालघर जिल्हा समन्वयक श्री मिलिंद पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पालघरचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते, आनंद आश्रम हायस्कूल चे मुख्याध्यापक फादर तसेच अनेक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालघर जिल्हा मानसोपचार तज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी मार्गदर्शनात सांगितले आहे की, व्यसंनामुळे माणसांना शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते, व्यसनाच्या चक्रव्यूहातून तरूण पिढीला बाहेर काढून त्याला निर्व्यसनी बनवणे हा उद्देश आहे. यावेळीची थीम “पुरावा स्पष्ट आहे: प्रतिबंधात गुंतवणूक करा” अशी आहे. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा पालघरचे पोलिस उपनिरीक्षक गणपत सुळे, पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत पराड, गोपनीय विभागाचे पोलीस नाईक सुयोग कांबळे, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे स्वप्नाली तुंबडा (मनोविकृती सामाजिक परिचारिका), शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक रोहित सर, आनंद आश्रम हायस्कूल चे शिक्षक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नशाबंदी मंडळाचे मिलिंद पाटील यांनी सांगितले की, “पालघर जिल्ह्यांतील ८ तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी रॅली, चित्रकला स्पर्धा, तर अंमली पदार्थ विरोधी शपथ जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालय, समाजकल्याण विभागातील आश्रमशाळेतील विद्यार्थींना देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाची सांगता अंमली पदार्थ विरोधी शपथ घेऊन करण्यात आली.

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी Say No To Drugs – Yes To Life, अंमली पदार्थांच्या विरोधात वातावरण निर्मिती करत ‘व्यसन सोडा माणसे जोडा’ तसेच ‘आम्ही कोणतेही व्यसन करीत नाहीत… तुम्ही ही करू नका’ असे आवाहन उपस्थितांना केले. जिल्हा परिषद पालघर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संगीता भागवत मॅडम यांनी सांगितले की, युवकांना अंमली पदार्थ विरोधी मानसिकता निर्माण करणे युवकांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत आहे.

हे ही वाचा:

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! हार्बर चा प्रवास आता जलद होणार..

Rohini Khadse यांच्या ‘बदाम ‘टीकेला Chandrakant Patil यांचं दिमाखदार उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss