PM Modi संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर, राष्ट्रपतींनी जेवणात बनवले खास पदार्थ…

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे त्यांचा फ्रान्सचा दौरा झाल्यानंतर शनिवारी दिनांक १५ जुलै रोजी संयुक्त अरब अमिरातच्या (UAE) दौऱ्यावर आहेत.

PM Modi संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर, राष्ट्रपतींनी जेवणात बनवले खास पदार्थ…

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे त्यांचा फ्रान्सचा दौरा झाल्यानंतर शनिवारी दिनांक १५ जुलै रोजी संयुक्त अरब अमिरातच्या (UAE) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी युएईचे राष्ट्रपती शेख बिन जायद यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक देखील केली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, अल नाहयान यांनी पंतप्रधान मोदींसाठी शाकाहारी जेवण बनवले आहे. राष्ट्रपती राजवाड्यातील कसर-अल-वतन येथे आयोजित मेजवानीची सुरुवात हरीस (गहू) आणि खजूर यांच्या सॅलडने झाली, जी स्थानिक भाज्यांसोबत दिली गेली. यानंतर मसाला सॉसमध्ये ‘ग्रील्ड (भाजलेल्या) भाज्या दिल्या गेल्या. मान्यवरांना फुलकोबी आणि गाजर तंदुरी काळी मसूर आणि स्थानिक गहू देण्यात आला. तसेच स्थानिक हंगामी फळेही देण्यात आली. मेजवानीच्या मेनूवर असे लिहिले होते की सर्व अन्न शाकाहारी आहे आणि तेलाने तयार केलेले आहे. दुग्धजन्य पदार्थ किंवा अंडी उत्पादने समाविष्ट नाहीत.

काय चर्चा झाली?

बहुआयामी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली. यादरम्यान त्यांचे राष्ट्रपती भवन ‘कसर अल वतन’ येथे पारंपारिक स्वागत करण्यात आले. येथे यूएईचे अध्यक्ष अल नाहयान यांनी त्यांचे स्वागत केले. ऊर्जा, अन्न सुरक्षा आणि संरक्षण ही क्षेत्रे पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्याच्या केंद्रस्थानी असल्याचे समजते. यादरम्यान दोन्ही देश त्यांच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतील. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA), ज्याने दोन्ही देशांमधील आर्थिक भागीदारीला नवीन चालना दिली, त्यावर कोविड-19 महामारीदरम्यान स्वाक्षरी करण्यात आली. भारत आणि UAE व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, अन्न सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण, फिनटेक, संरक्षण, सुरक्षा आणि लोकांशी संपर्क यासारख्या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करत आहेत.

हे ही वाचा:

शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटील म्हणाले…

पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करु असा शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मानस

हिंदू असो की मुस्लिम यांचे रक्त एकच, एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version