spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

७५ व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर उत्तरप्रदेशच्या चित्ररथाने सगळ्यांचे लक्ष वेधले

आज संपूर्ण देशभरात ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे.

आज संपूर्ण देशभरात ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे. या दिवशी सगळीकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशाची राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर आज परेड आणि विविध संस्कृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या भव्य सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना बोलावण्यात आले होते.

देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध संस्कृतीचे, राज्याचे दर्शन झाले आहे. यामध्ये एक प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे अयोध्येत तयार करण्यात आलेले राम मंदिर. राज पथावर अयोध्यतील राम मंदिर साकारण्यात आले आहे. या चित्ररथाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘अयोध्या: विकसित भारत-सम्राध विरासत’ अशी थीम ठेवण्यात आली होती. दिल्लीच्या राजपथावर उत्तर प्रदेशसह, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आसाम, तेलंगणा त्यांसारख्या अनेक राज्यांनी या चित्ररथमध्ये सहभाग घेतला होता. राजपथावर कला, संस्कृती, परंपरा, बोलीभाषा, पेहराव या सगळ्याचे अद्भूत दर्शन घडवणारा सोहळा पार पडला आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले आहे.

अयोध्येत २२ जानेवारीला भव्य राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी देश विदेशातून अनेक दिग्ग्जना बोलावण्यात आले होते. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येत राम मंदिर तयार झाले आहे. संपूर्ण देशात रामाचा मोठ्या प्रमाणावर जयघोष केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळा पूर्ण झाल्यानंतर प्रभू रामांचे रूप सगळ्यांसमोर आले आहे.

हे ही वाचा:

प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानासंदर्भात प्रबोधन करण्याची वेळ आली, जयंत पाटील

Republic Day Parade 2024 : जय जिजाऊ, धन्य शिवराय…, दिल्लीच्या कर्तव्य पथावर झळकले माँसाहेब आणि बाल शिवबा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss