spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Karmaveer Bhaurao Patil यांच्या 137 जयंतीनिमित्त शरद पवार यांनी कर्मवीर अण्णांच्या समाधीला केले अभिवादन !

बहुजनांना  शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले. शिक्षण आणि श्रम यांची सांगड घालून सक्षम पिढी घडवण्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर निर्माण केला.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज दि. २२ सप्टेंबर रोजी जयंती आहे. बहुजनांना  शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले. शिक्षण आणि श्रम यांची सांगड घालून सक्षम पिढी घडवण्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर निर्माण केला. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हा मूलतंत्र देखील दिला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सर्वच पक्षातील नेत्यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे आणि त्यांच्या घरात देखील शिक्षणाची गंगा जावी या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, असे कर्मयोगी पद्मश्री पद्मविभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 137 वी जयंती साजरी होत असेल यानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी साताऱ्यात येऊन त्यांच्या समाधीला अभिवादन केले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने प्रेरित असलेली आणि त्यांच्या ध्येयधोरणावर चालणारी रयत शिक्षण संस्था आज देखील सर्वसामान्य आणि बहुजनांच्या मुलांना अविरत शिक्षण देत आहे याच शिक्षण संस्थेची स्थापना करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीला आज 137 वर्षे पूर्ण होत आहे या निमित्ताने देशाचे नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना अभिवादन केले आहे त्याच वेळेला त्यांनी या शिक्षण संस्थेची वाटचाल यापुढे कशी राहील आणि सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण कसे पोहोचवता येईल याच पद्धतीने रयत शिक्षण संस्था यापुढे देखील वाटचाल करत राहील आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सर्वसामान्यांना शिक्षण देण्याचे स्वप्न आहेत ते अविरत पूर्ण करत राहील असे देखील मत यावेळेला खासदार शरद पवार यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीदिनी अभिवादन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील यांनी म्हटले की,”ज्या बहुजन समाजासाठी प्रगतीची कवाडे कायमची बंद होती, त्यांच्या दारात शिक्षण घेऊन जाणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती. कर्मवीरांच्या या कार्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात आमुलाग्र क्रांती झाली. गावागावात शिक्षण पोहोचले. बहुजन समाज सुशिक्षित झाला”. शिक्षण आणि श्रम यांची सांगड घालून सक्षम पिढी घडवण्याचा आदर्श कर्मवीर भाऊराव पाटील यांनी निर्माण केला. कमवा आणि शिका या अभिनव प्रयोगातून त्यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षणाचा मार्ग खुला करून दिला. शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवली. अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही समाजातील मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करुन देणाऱ्या थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीदिनी अभिवादन केले.

महायुतीत आल्यास Prakash Ambedkar यांना मंत्रिपद देऊ, Ramdas Athawale यांची ‘वंचित’ ला मोठी ऑफर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss