Patanjali Share, गौतम अदानींच्या पाठोपाठ आता रामदेव बाबांना देखील मोठा झटका!

काही दिवसांपूर्वी अदानी गृपचे मालक गौतम अदानी यांना मोठा झटका हा बसला होता. काही त्यांच्या शेअर मध्ये मोठी घसरण ही झाली होती.

Patanjali Share, गौतम अदानींच्या पाठोपाठ आता रामदेव बाबांना देखील मोठा झटका!

काही दिवसांपूर्वी अदानी गृपचे मालक गौतम अदानी यांना मोठा झटका हा बसला होता. काही त्यांच्या शेअर मध्ये मोठी घसरण ही झाली होती. तर आता त्यांच्या पाठोपाठ रामदेव बाबा यांना देखील मोठा धक्का हा बसत चालला आहे. कारण त्यांच्या पतंजली फूड्स कंपनीचा स्टॉक दिवसेंदिवस खाली येत आहे. त्यामुळे त्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या १ आठवड्यापासून पतंजली फूडचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत.

२४ जानेवारीपासून पतंजली फूड्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे . २४ फेब्रुवारीला पतंजली फूड्सच्या शेअरची किंमत १२०८ रुपये होती, जी ३ फेब्रुवारीला ९०७ रुपयांपर्यंत घसरली. हा साठा २५ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. ३ फेब्रुवारी रोजी पतंजली फूड्सचा स्टॉक लोअर सर्किटवर पोहोचला होता. मात्र, सोमवारी व्यापारी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी बाजार सुरू झाल्याने शेअर्समध्ये तेजी दिसून आली. आज पतंजलीचा शेअर ९३६. ९० वर पोहोचला आहे. ३ फेब्रुवारी रोजी कंपनीचे बाजार भांडवल ३२८२५. ६९ कोटी रुपये आहे, तर २७ जानेवारी रोजी पतंजलीचे मार्क कॅप सुमारे ४०,००० कोटी रुपये होते.

फक्त एका आठवड्यात पतंजलीच्या बाजार भांडवलात ७००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. डिसेंबर तिमाहीत पतंजलीचा निव्वळ नफा १५ टक्क्यांनी वाढला आहे. त्याचा निव्वळ नफा २६९.१८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. निव्वळ नफ्यात वाढ झाल्यानंतरही कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. १२०८ रुपयांचा शेअर आठवडाभरात ९०८ रुपयांपर्यंत घसरला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सप्टेंबर २०२२ मध्ये पतंजली फूड्सचे मार्केट कॅप ५१ हजार कोटी रुपये होते, जे जानेवारी २०२३ मध्ये घसरून ३३ हजार कोटी रुपयांच्या जवळ आले. या आकड्याचा हिशोब केला तर ५ महिन्यांत गुंतवणूकदारांना १८००० कोटींहून अधिकचा फटका बसला आहे.

जसजसा शेअर बाजार खाली येत आहे. दिवसेंदिवस गुंतवणूकदारांची चिंताही वाढत आहे. मोठ्या संख्येने लोकांनी पतंजलीचे शेअर्स खरेदी केले आहेत. सध्या शेअर बाजारात मोठी उलथापालथ सुरू आहे.

हे ही वाचा : 

Grammy Awards 2023, भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा कोरलं ग्रॅमी पुरस्कारावर नाव

Earthquake In Turkey, ७. ९ रिश्टर स्केलच्या भूकंपानं तुर्की हादरलं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version