Pink Colour, मुलींसाठी गुलाबी रंगचं का वापरला जातो ?

कोणतीही गोष्ट खरेदी करायची असूद्यात मुलींसाठी काही घ्यायचे म्हटले की मुख्यतः गुलाबी रंगाचा विचार केला जातो. गुलाबी हा रंग मुलींच्या आवडीचा हे जणू समीकरणच झाले आहे.

Pink Colour, मुलींसाठी गुलाबी रंगचं का वापरला जातो ?

कोणतीही गोष्ट खरेदी करायची असूद्यात मुलींसाठी काही घ्यायचे म्हटले की मुख्यतः गुलाबी रंगाचा विचार केला जातो. गुलाबी हा रंग मुलींच्या आवडीचा हे जणू समीकरणच झाले आहे. तसेच मुलांसाठीही मुख्यतः निळ्या रंगाचा विचार केला जातो. काही घ्यायचे असले की, मुलींसाठी गुलाबी आणि मुलांसाठी निळा असा विचार केला जातो. परंतु, गुलाबी रंग मुलींसाठी आणि मुलांसाठी निळा रंग कोणी ठरवला? बार्बीसाठीही पिंक रंगाची निर्मिती का करण्यात आली ? महिलांसंदर्भातील जाहिराती, आरोग्य योजनांमध्ये गुलाबी रंग का निवडण्यात आला याविषयीची रंजक गोष्ट जाणून घेऊयात.

साधारणतः १९व्या शतकात पेस्टल रंग (Pastel colors) लहान मुलांसाठी लोकप्रिय होऊ लागले. आता एक ट्रेंड (trend) दिसतो की, निळा रंग मुलांसाठी, तर गुलाबी रंग मुलींसाठी वापरला जातो. परंतु, १९व्या शतकात मुलींसाठी निळा रंग तर मुलांसाठी गुलाबी रंग होता. जून १९१८ मध्ये लेडीज होम जर्नलने एक लेख प्रकाशित केला होता, त्यात त्यांनी मुलांसाठी गुलाबी आणि मुलींसाठी निळा आहे, असा दावा केला. परंतु प्रसारमाध्यमांनी (media) एक रंग किंवा दुसरा रंग एका लिंगाशी किंवा दुसर्‍या लिंगाशी संबंधित असल्याच्या कल्पनेला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली होती. ही संकल्पना पुढे ‘मार्केटिंग स्ट्रॅटेजी’ झाली. कपडे उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांनी लिंग आणि लिंगाशी संबंधित कपडे, वस्तू यांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. १९२७ ला टाईम मासिकाने छापलेल्या वृत्तानुसार डिपार्टमेंटल स्टोअर्सवरती रंग आणि वस्तू यांची यादी देण्यात आली होती. अमेरिकेमध्ये मुलींनी गुलाबी रंगाचे कपडे घालावे, असे नियम करण्यात आले. न्यूयॉर्क शहरातील बेस्ट अँड कंपनी, क्लीव्हलँडमधील हॅले आणि शिकागोमधील मार्शल फील्डनेही मुलांसाठी निळा रंग निश्चित करण्यात आला. पण मग मुलींसाठी गुलाबी आणि मुलांसाठी निळा रंग कसा झाला? खरंतर गुलाबी रंग हा लाल रंगाच्या जवळ जाणारा आहे. लाल रंग रोमँटिक तसेच ऍग्रेसिव्ह रंग म्हणून ओळखला जातो. या लाल रंगाची फिकट छटा म्हणजे गुलाबी रंग.

१९४० नंतर मुलींसाठी गुलाबी रंग ठरवण्याकडे प्रवास सुरु झाला आणि यामध्ये मोठा सहभाग ‘बार्बी’चा (Barbie) होता. बार्बीने गुलाबी रंगाचा कपडे परिधान केले. तिच्या वस्तू मोठ्या प्रमाणात गुलाबी रंगाच्या होत्या. याला एक कारण म्हणजे अमेरिकेमध्ये सुरू झालेली स्त्रीवादी चळवळ होती.या स्त्रीवादी चळवळीने युनिसेक्स कपड्यांना प्राधान्य दिले. त्यामुळे मुलग्यांसाठी असणारा गुलाबी रंग मुलींना देण्यात आला. या रंगाचा अधिक प्रचार करण्याचे कार्य चित्रपट माध्यमांनी केले. तसेच तत्कालीन सेलिब्रेटीज या पिंक रंगाकडे आकर्षित झाले. १९५३ मध्ये अमेरिकेत घडलेली एक घटना सुद्धा महिलांमध्ये गुलाबी रंगाची आवड निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. या वर्षी अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवला होता आणि डिवाईट इस्न्होवर यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला त्यांच्या पत्नी ‘मॅमी इस्त्रोव्हर’ (Mamie Istrover) या गुलाबी रंगाच्या गाऊन मध्ये आल्या होत्या. त्यामुळे महिलांसाठी हा रंग अधिक प्रसिद्ध होऊ लागला. भारतामध्येही मायावती (Mayawati) यांनी त्यांच्या प्रचारामध्ये गुलाबी रंगाचा वापर केला होता. महिलांसाठी गुलाबी रंगाच्या रिक्षा त्यांनी आणल्या. तसेच त्यांनी कायम गुलाबी रंग परिधान केला.

मेरीलँड विद्यापीठातील (University) इतिहासाचे संशोधक आणि प्राध्यापक जो पाओलेटी वंश आणि लिंग ओळख यावर संशोधन करतात. त्यांच्या मते, १९५० पर्यंत बाळाच्या लिंगानुसार विशिष्ट रंगांची संख्या कमी होत गेली. गुलाबी रंग निश्चितता, शक्तीचे प्रतीक मानले जात असे. त्यामुळे तो रंग मुलांसाठी ठरवण्यात आला आणि मुलींसाठी निळा रंग निवडण्यात आला कारण तो शांतता, संयमाचे प्रतीक मानला जातो. मात्र, महायुद्धाच्या काळात आधुनिकतावाद आणि स्त्रीवादाचे वारे वाहू लागले. स्वतंत्र मुलगी आनंदासाठी गुलाबी आणि निळ्या रंगात आली. फ्रान्समधील फॅशन शोमध्ये निळ्या आणि स्त्रीलिंगी गुलाबी रंगाचेही प्रदर्शन करण्यात आले. दरम्यान असा कोणताही लिकित नियम नाही की, महिलांनी गुलाबी केस आणि निळे कपडे घालावेत. पण, २० व्या शतकात ‘ट्रेंड’ अजूनही सुरू झाला आणि तो अजूनही कायम आहे.

हे ही वाचा:

पिंपरी-चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यामध्ये ‘बीडचे कनेक्शन’

अक्षय कुमारच्या OMG 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, सेन्सॉर बोर्डकडून चित्रपटात बदल

वजन कमी करायचे आहे? मग नाश्त्याला बनवा Oats Tikki

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version