Saturday, July 6, 2024

Latest Posts

PIXAR च्या Inside Out 2 या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात केली रेकॉर्ड ब्रेक कमाई

इनसाईड आउट २ हा चित्रपट 2015 सालच्या एका ऑस्कर विजेत्या लोकप्रिय चित्रपटाचा पुढचा भाग आहे, जो रिले नावाच्या एका युवतीच्या भावनांवर आधारित आहे. या चित्रपटाचा पहिला भाग हा आनंद, भय, क्रोध या भावनांविषयी भाष्य करणारा होता तर नवीन भाग हा ईर्षा, चिंता यांसारख्या भावनांवर भाष्य करतो.

पिक्सरच्या इनसाईड आउट 2 या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड्स तोडत अंदाजे 295 मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. डिझनी या मूळ कंपनीने म्हटल्याप्रमाणे ही एका ॲनिमेटेड फिल्मची जागतिक स्तरावर झालेली आतापर्यंतची सर्वाधिक कमाई आहे. उत्तर अमेरिकेत या चित्रपटाची तिकीटविक्री 155 मिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या या वर्षीच्या डयून पार्ट 2 या चित्रपटालाही मागे टाकले आहे.

ही चित्रपटगृहांसाठी एक मोठी उपलब्धी आहे, कारण यावर्षी काही नव्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूपच कमी कमाई केली आहे. इनसाईड आऊट 2 या चित्रपटाचा पहिला आठवडा मूळ चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत खूपच चांगला होता. मूळ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 90 मिलियन डॉलर्सची कमाई केली होती आणि नंतर जगभरात 858 मिलियन डॉलर्सची कमाई केली होती. उत्तर अमेरिकेतील बाजारपेठेत ही एका चित्रपट कंपनीची दुसरी सर्वांत चांगली सुरुवात होती, जी 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या इनक्रेडिबल्स 2 चित्रपटाच्या तुलनेत बरोबर काही अंकांनी पाठी आहे.

सध्या प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांच्या अपेक्षेपेक्षा कमी कमाईनंतर अशा प्रकारचा ब्लॉकबस्टर ओपनिंग आठवडा हा पिक्सर कंपनीसाठी एक उत्तम प्रोत्साहन आहे. इनसाईड आउट २ हा चित्रपट 2015 सालच्या एका ऑस्कर विजेत्या लोकप्रिय चित्रपटाचा पुढचा भाग आहे, जो रिले नावाच्या एका युवतीच्या भावनांवर आधारित आहे. या चित्रपटाचा पहिला भाग हा आनंद, भय, क्रोध या भावनांविषयी भाष्य करणारा होता तर नवीन भाग हा ईर्षा, चिंता यांसारख्या भावनांवर भाष्य करतो. इतर चित्रपटांच्या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर इनसाईड आउट 2 या चित्रपटाची यशस्वी सुरुवात ही चित्रपट कंपन्यांसाठी एक चांगली सुरुवात आहे.

मे च्या पहिल्या आठवड्यापासून ते सप्टेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यापर्यंतचा कालावधी हा वार्षिक तिकीट विक्रीचा सुगीचा काळ असतो. खरेतर, गेल्या वर्षी झालेल्या अभिनेते, अभिनेत्री आणि पटकथा लेखकांच्या संपामुळे यावर्षी चित्रपटनिर्मिती फार कमी प्रमाणात झाली आहे. या चित्रपट क्षेत्राला विषय आणि ग्राहक या दोन्हींसाठी स्ट्रीमिंग सेवांशी संघर्ष करावा लागत आहे. मीडिया मार्केट रिसर्च कंपनी कॉमस्कोरच्या मते, यावर्षी उत्तर अमेरिकेत आतापर्यंत झालेली चित्रपटांची तिकीटविक्री ही 2023 सालच्या याच कालावधीत झालेल्या तिकीटविक्रीच्या तुलनेत जवळपास एक चतुर्थांश भाग कमी आहे.

हे ही वाचा

Tips For Rainy Season: पावसाळ्यात ‘या’ गोष्टी चुकुनही करू नका

Alka yagnik यांना झालेला Sensorineural Hearing Loss हा आजार नक्की काय आहे? काय आहेत लक्षणे?

Follow Us

Latest Posts

Don't Miss