एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी ‘ऑपरेशन युनिकॉर्न’चे नियोजन

एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी ‘ऑपरेशन युनिकॉर्न’चे नियोजन

ब्रिटिश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणाऱ्या साम्राज्याच्या साक्षीदार असलेल्या, ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके विराजमान असणाऱ्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं काल वृद्धपकाळानं निधन झालं. त्या ९६ वर्षांच्या होत्या. स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला ब्रिटीश राजघराण्याकडून आणि ब्रिटन सरकारकडून त्याचबरोबर जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला जात आहे. महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीच्या नियोजनासाठी ‘ऑपरेशन युनिकॉर्न’ सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला… ! दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप

एलिझाबेथ यांचा जन्म लंडनमध्ये २१ एप्रिल १९२६ रोजी झाला. एलिझाबेथ यांचे वडील जॉर्ज यांचे १९५२ मध्ये निधन झाले. त्यानंतर एलिझाबेथ यांना १९५२ मध्ये ब्रिटनची महाराणी म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सलग सात दशके ब्रिटनची महाराणी म्हणून कामकाज पाहिले. एलिझाबेथ या जगात सर्वाधिक काळ सत्ता हाकणाऱ्या महाराणी आहेत. एलिझाबेथ यांच्या मृत्यनंतर तब्बल १० दिवसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यासाठी काही विशेष कार्याक्रमची नियोजन करण्यता येणार आहे.

नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाची मान उंचावली, डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय

महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाच्या दिवसांपासून पुढचे दहा दिवस होणाऱ्या कार्यक्रमांसाठी ऑपरेशन लंडन ब्रिज तयार केला होता. मात्र स्कॉटलँडमध्ये महाराणींचा मृत्यू झाला. त्यामुळे या ऑपरेशनचं नाव स्कॉटलँडचा राष्ट्रीय पशू युनिकॉर्नच्या नावे ठेवण्यात आलं. नवे किंग चार्ल्स यांच्यासह शाही कुटुंबातले इतर सदस्यही बालमोरलमध्ये पोहचले आहेत. एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

राणी एलिझाबेथ II यांचे निधन झाले आहे, बकिंगहॅम पॅलेसने घोषणा केली

Exit mobile version