spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PM Modi Birthday : ‘५६ इंच’ थाळी संपवा आणि जिंका ‘साडे आठ लाख’ रुपयांचं बक्षीस

उद्या १७ सप्टेंबर म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आहे. उद्या नरेंद्र मोदी हे त्यांच्या वयाची ७२ ओलांडतील.

उद्या १७ सप्टेंबर म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आहे. उद्या नरेंद्र मोदी हे त्यांच्या वयाची ७२ ओलांडतील. याच निम्मित दिल्लीतील एक हॉटेलमध्ये एक विशेष बाकीसह जाहीर करण्यात आले आहे. आणि हे बक्षीस साधेसुधे नसून तब्ब्ल साडे आठ लाखांचे हे बक्षीस असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वाढदिवसानिम्मित दिल्लीतल्या कनॉट प्लेस इथल्या ARDOR 2.1 या हॉटेलमध्ये ही थाळी मिळणार आहे. या थाळीमध्ये ५६ पदार्थ असतील, ज्यामध्ये व्हेज-नॉन व्हेज दोन्ही पद्धतीचे पदार्थ ग्राहकांना मिळणार आहेत. हॉटेलच्या मालकाने या खास थाळीवर अनेक बक्षिसंही ठेवली आहेत. जर कोणत्याही जोडप्यापैकी एकाने ही थाळी ४० मिनिटांच्या आत संपवली, तर त्या व्यक्तीला साडे आठ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. तसंच या थाळीवर केदारनाथ यात्राही बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.

या विषयी बोलताना या हॉटेलचे मालक सुमित कलारा यांनी सांगितलं की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान करतो. ते आपल्या देशाची शान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना एक अनोखी भेट देऊ इच्छितो. म्हणून आम्ही एका भव्य थाळी निर्माण करत आहोत. या थाळीचं नाव ५६ इंच असं असेल. आम्ही ही थाळी त्यांना भेट देऊ इच्छितो आणि आमची इच्छा आहे की त्यांनी इथे येऊन खावी. पण सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही असं करू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या समर्थकांना विनंती करतो की ज्यांचं मोदींवर प्रेम आहे, त्यांनी यावं आणि या थाळीचा आस्वाद घ्यावा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाढदिवसानिमित्त गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये जाऊन आपल्या आईचा आशिर्वाद घेतील. त्यानंतर ते मध्यप्रदेशला जातील, तिथे कूनो नॅशनल पार्कमध्ये जातील जिथे नामिबियातून ८ चित्ते आणले जाणार आहेत. तर भाजपाकडून पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

Rain Alert : राज्यभर मुसळधार पाऊस, तर पुढील ३ ते ४ तास मुंबईकरांसाठी सतर्कतेचे

पुण्यात आयोजित केलं अजब ‘सेक्स तंत्र’ प्रशिक्षण शिबीर,हिंदू महासभेचा विरोध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss