PM Modi Death Threat : दाऊदच्या हस्तकांकडून मोदींच्या हत्येचा कट? मुंबई पोलिसांना माहिती

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या (Underworld Don Dawood Ibrahim) हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हत्येचा कट आखण्यात आला आहे,

PM Modi Death Threat : दाऊदच्या हस्तकांकडून मोदींच्या हत्येचा कट? मुंबई पोलिसांना माहिती

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या (Underworld Don Dawood Ibrahim) हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हत्येचा कट आखण्यात आला आहे, अशी माहिती देणारे ऑडिओ मेसेज (Audio Message) एका अज्ञाताकडून मुंबई (Mumbai News) वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर आल्याची माहिती मिळाली. धक्कादायक मेसेजनंतर पोलिसांकडून याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली.

ज सकाळी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या क्रमांकावर एक व्हॉटसअप मेसेज आला. या मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे ठार मारण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली. यावेळी मात्र एकापाठोपाठ एक अशा अनेक ऑडिओ क्लिप वाहतूक नियंत्रण कक्षाच्या नंबरवर आल्या. यामध्ये एका अज्ञात इसमानं दावा केला होता की, “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत आहेत. तसेच, हे हस्तक देशाला बर्बाद करण्याच्या प्रयत्नात असल्याचंही या अज्ञात इसमानं म्हटलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी वाहतूक नियंत्रण क्रमांकावर ७ ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज आले. त्यापाठोपाठ २१ तारखेला पुन्हा १२ ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज प्राप्त झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसच्या ट्रॅफिक कंट्रोल मोबाईल क्रमांकावर हा धमकीचा मेसेज आला. यावेळी कंट्रोल नंबरवर अनेक ऑडिओ क्लिपसही आल्या आहेत. त्यापैकी एका क्लिपमध्ये मोदींना ठार मारण्याचा दावा केला आहे. “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे गुंड देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार आहेत” आणि देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं या ऑडीओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.

पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या व्यक्तीपर्यंत पोलीस पोहोचले आहे. तपासात आढळून आले की, मेसेज करणारा व्यक्ती पूर्वी एका डायमंड कंपनीत दागिने घडवणारा कारागीर होता. परंतु मानसिक आजारामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्यानं तो एक वर्षांपासून बेरोजगार आहे. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. ही व्यक्त केरळमध्ये असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा : 

श्रद्धा हत्याकांड प्रकरणी आफताबची कोर्टासमोर मोठी कबुली म्हणाला, हत्येनंतर मृतदेहाचे ३५ तुकडे दररोज एक एक करून…

मुंबईत गोवरचा उद्रेक, आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू, नाशिकमध्ये रुग्ण आढळले

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version