spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोरबी पूल कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी केले १२०० पानांचे आरोपपत्र दाखल, ओरेवाचे एमडी जयसुख पटेलांच्या नावाचाही समावेश

मोरबीतील झुलता पूल कोसळल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या नऊ आरोपींव्यतिरिक्त ओरेवा ग्रुपचे एमडी जयसुख पटेल यांचेही आरोपपत्रात दहावे आरोपी म्हणून नाव आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गुजरातमधील मोरबी शहरात झुलता पूल कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. या अपघातात १३५ जणांचा मृत्यू झाला. पोलिस उपअधीक्षक पी.एस.जाला यांनी मोरबी सत्र न्यायालयात १,२०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. जाला हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, मोरबीतील झुलता पूल कोसळल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या नऊ आरोपींव्यतिरिक्त ओरेवा ग्रुपचे एमडी जयसुख पटेल यांचेही आरोपपत्रात दहावे आरोपी म्हणून नाव आहे.

मोरबी पुलाच्या दुरुस्ती, ऑपरेशन आणि व्यवस्थापनाशी संबंधित सर्व व्यवहार आणि वाटाघाटी त्यांच्या थेट अधिकारात असल्याने पटेल यांना आरोपी म्हणून घोषित करण्यात आल्याचे तपास पथकाने म्हटले आहे . मोरबी येथील ओरेवा यांच्या आवारातून जप्त केलेल्या कागदपत्रांवर त्यांची स्वाक्षरी दिसून आली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०४ (दोषी हत्या), ३-०८ (दोषी हत्येचा प्रयत्न) आणि ११४ (गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे) अंतर्गत “जबाबदार एजन्सी” विरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

अजिंता मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड (ओरेवा ग्रुप) मोरबी येथील मच्छू नदीवर बांधलेला हा ब्रिटीशकालीन झुलता पूल चालवत होते. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी घडलेल्या घटनेबाबत न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जयसुख पटेल यांच्याविरुद्ध अटक वॉरंट आधीच जारी केले आहे. सध्या पटेल यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर १ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

गुजरातमधील मोरबी शहरात मच्छू नदीवरील शतकानुशतके झुलता पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत १३५ जणांना जीव गमवावा लागला होता. गेल्या वर्षी ७ नोव्हेंबर रोजी मोरबी येथे झालेल्या भीषण अपघाताची स्वतःहून दखल घेत गुजरात उच्च न्यायालयाने राज्याच्या गृह विभागासह संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि एका आठवड्यात अहवाल मागवला. तर नोव्हेंबरमध्येच सर्वोच्च न्यायालयाने मोरबी पूल कोसळण्याची घटना ही मोठी शोकांतिका असल्याचे म्हटले होते. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी सुरू असलेल्या गुजरात उच्च न्यायालयाला या प्रकरणाची सुनावणी वेळेत पूर्ण करण्यास सांगितले.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींनी केली परीक्षा पे चर्चा, ३८ लाख विद्यार्थ्यांशी साधला संवाद

‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून शाळकरी मुलांमध्ये भाजपाचा प्रचार!, अतुल लोंढेंचा गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss