चिनी फंडींग प्रकरणी दिल्लीतील पत्रकारांच्या घरी पोलिसांची छापेमारी

दिल्लीमधील अनेक पत्रकार आणि लेखकांच्या घरी पोलिसांनी छापे टाकले आहेत.

चिनी फंडींग प्रकरणी  दिल्लीतील पत्रकारांच्या घरी पोलिसांची छापेमारी

दिल्लीमधील अनेक पत्रकार आणि लेखकांच्या घरी पोलिसांनी छापे टाकले आहेत. पत्रकार अभिसर अभिसार शर्मा (Journalist Abhisar Sharma) यांच्यासह अनेक पत्रकारांचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. संजय राजोरा, भाषा सिंह, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ, सोहेल हाश्मी यांच्या देखील घरी पोलिसांनी छापेमारी केली आहे. दिल्लीतील हे सर्व पत्रकार न्यूज क्लिकशी संबंधित आहेत. तसेच यातील काही पत्रकारांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी चिनी फंडिंग संदर्भात आरोप न्यूज लिंक करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने केस दाखल केली होती.

अभिसार शर्मा यांनी ट्विट केले की, “दिल्ली पोलीस सकाळी माझ्या घरी पोहोचले आणि माझा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे.” ३ ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांनी सकाळी न्यूज पोर्टलशी संबंधित पत्रकार अभिसार शर्मा आणि भाषा सिंह यांच्यासह अनेक पत्रकार आणि लेखकांच्या घरी छापे मारी केली. त्यांच्यावर न्यूज पोर्टलला चीनकडून निधी मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकार अभिसार यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे. पत्रकार भाषा सिंह यांच्या घरी देखील पोलिसांनी छापा टाकला आहे. यावर ट्विट करत त्या म्हणल्या आहेत ‘ हे माझं शेवटचं ट्विट आहे. माझा फोन पोलिसांनी जप्त केला आहे ‘.

न्यू यॉर्क टाईम्स (The New York Times) च्या एका एका रिपोर्टमध्ये नेव्हिल रॉय सिंघम (Neville Roy Singham), ज्यानं न्यूजक्लिक (NewsClick) या न्यूज वेबसाईटला मदत केली. चिनी कम्युनिस्ट पक्ष यांचा संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्यांनी असा दावा करण्यात आला नेव्हिल रॉय सिंघमच्या नेटवर्कनं चुकीच्या माहितीला प्रोत्साहन दिलं आणि चीन समर्थक संदेशांचा प्रचार करून मुख्य प्रवाहातील काही प्रकरणांवर प्रभाव टाकला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत न्यूजक्लिकवर छापेमारीची माहिती दिली होती. त्यानंतर ते म्हणाले ‘ सिंघमनं न्यूजक्लिकला आर्थिक मदत केली आहे. तसेच, चीनकडूनही त्यांना आर्थिक मदत केली जात आहे.

Exit mobile version