Saturday, July 6, 2024

Latest Posts

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता ; लगेचच सैनिकी छावण्या सतर्क

"अभिनंदनाच्या संदेशांना उत्तर देण्यात व्यस्त असलेल्या पंतप्रधांनांना जम्मू-काश्मीरमध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या भाविकांच्या कुटुंबियांच्या किंकाळ्याही ऐकू येत नाहीत. येथे गेल्या ३ दिवसांपासून ३ वेळा दहशतवादी हल्ला झाला. या घटना फार आधीपासून घडत आहेत परंतु नरेंद्र मोदी आपल्या उत्सवात मग्न आहेत. भाजप सरकार असताना दहशहतवादी हल्ल्याची योजना आखणाऱ्यांना का पकडले जात नाही ? याचे देश उत्तर मागत आहे."

जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) कठुआ-पठाणकोट या भागाननमध्ये पाकिस्तानने (Pakistan) घुसखोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. या मार्गावरील लष्करी छावण्या (Military Camps), रेल्वे इत्यादी ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील सर्व सैन्याला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याचसोबत तेथील लोकांची सुरक्षिततासुद्धा भारतीय सैनिकांवर सोपवण्यात आली आहे. डोळ्यात तेल घालून पाहणी चालू आहे. पाकिस्थानी ड्रोनची भारतीय सीमेवरील घुसखोरी वाढली आहे. एका बाजूने सैन्याला या कारवायांमध्ये गुंतून ठेवायचे तर दुसरीकडे याचा फायदा घेऊन सीमेच्या एका बाजूने भारतात घुसखोरी करायची अशी त्यांची रणनीती असल्याचे लक्षात येते.

असा पाकिस्तानी लष्कराचा कयास असल्याचे सीमा सुरक्षा दल (BSF) च्या सूत्रांनी माहिती दिली. दहशतवादी सीमेकडून काश्मीर मार्गे घुसखोरी करायचे आहे असे निदर्शनास आले. त्यामुळे येथील रेल्वेसुरक्षिततेसाठी आणखी लष्करी फौज तैनात केली जाणार आहे. दहशतवाद्यांकडून सैदा सुखाला या गावात मंगळवारी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जखमी झालेल्या एका गावकऱ्याला तूर्तास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आता त्या गावकऱ्याची प्रकृती पाहिल्यापेक्षा अधिक सुधृढ आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. पाकिस्तानच्या या प्रश्नावर कायमचा उपाय काढणे अधिक गरजेचे आहे. तर ही उपाययोजना कशी करता येईल याबाबत विचार विनिमय सुरु आहे. यासाठी पाकिस्तानबरोबर चर्चा केल्यावाचून कोणताही पर्याय नाही. असे फाहरुख अब्दुल्ला (Fahruk Abdulla) यांनी म्हटले आहे. ते नेशनल काँग्रेस पक्षाचे (National Congress Party)  अध्यक्ष आहेत. जर हा दहशतवाद संपवायचा असेल, तर पाकिस्तानशी बोलून घेणे गरजेचं आहे. फाहरुख अब्दुल्ला यांनी दहशदवादी हल्ल्याबाबत काळजी व्यक्त केली आहे. असे त्यांनी बुधवारी संगितले. या हल्ल्यात निष्पाप नागरिक मरण पावत आहे.

कठुआ मध्ये झालेल्या हल्ल्यात सैदा सुखाला (Sida Sukhala) या गावात पिण्याच्या पाण्याची मागणी गावकऱ्यांकडे केली होती. या दहशदवाद्यांना घाबरलेल्या गावकऱ्यांनी लगेचच सुरक्षा दलातील जवानांना दूरध्वनी करून घडल्या प्रकारची माहिती त्यांच्या पर्यंत पोचवली. दहशहतवादी शिरल्याची माहिती मिळताच तेथे जावान तातडीने हजर झाले. दरम्यान जवानांवर दहशहदवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनाईड टाकून मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. या चकमकी दरम्यान भारतीय जवानांनी दोन्ही दहशदवाद्यांना मृत्युमुखी पाडले आहे.

घडल्या प्रसंगावरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपले मत मांडले ते पुढील प्रमाणे –

“अभिनंदनाच्या संदेशांना उत्तर देण्यात व्यस्त असलेल्या पंतप्रधांनांना जम्मू-काश्मीरमध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या भाविकांच्या कुटुंबियांच्या किंकाळ्याही ऐकू येत नाहीत. येथे गेल्या ३ दिवसांपासून ३ वेळा दहशतवादी हल्ला झाला. या घटना फार आधीपासून घडत आहेत परंतु नरेंद्र मोदी आपल्या उत्सवात मग्न आहेत. भाजप सरकार असताना दहशहतवादी हल्ल्याची योजना आखणाऱ्यांना का पकडले जात नाही ? याचे देश उत्तर मागत आहे.”

“दहशतवादी कारवाया करून जम्मू-काश्मीरचे प्रचंड नुकसान करणाऱ्या पाकिस्तानशी का चर्चा करायची ? पाकिस्तानला जी भाषा कळते, त्याच भाषेत त्यांना प्रतिउत्तर देणे गरजेचे आहे.”

असे रवींद्र राणा (Ravindra Rana) या जम्मूकाश्मीर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष यांनी उद्गार काढले.

हे ही वाचा

शेतकऱ्यांसाठी नवी खुश खबर ; पंतप्रधानांनी आणली ‘ही’ योजना

पशुसंवर्धन आयुक्तालयात ‘ही’ आहे नवी भरती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss