पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास

भारतात ९ आणि १० सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये जी-२० ची शिखर परिषद होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी याविषयी भाष्य केलं. जग भारताला मार्गदर्शकाच्या रुपात पाहात आहे. आपले शब्द आणि ध्येय जगाकडून भविष्यातील दिशादर्शकाच्या स्वरुपात पाहिले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास

भारतात ९ आणि १० सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये जी-२० ची शिखर परिषद होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी याविषयी भाष्य केलं. जग भारताला मार्गदर्शकाच्या रुपात पाहात आहे. आपले शब्द आणि ध्येय जगाकडून भविष्यातील दिशादर्शकाच्या स्वरुपात पाहिले जात आहेत. आता या केवळ कल्पना राहिलेल्या नाहीत. जगाला आपल्याकडून आशा आहेत, असं मोदी म्हणाले. भारत १०० व्या स्वातंत्र्यदिनी एक विकसित आणि प्रगत राष्ट्र असेल. तसेच देशात भ्रष्टाचार, जातीवाद, जमातवाद याला कोणतीही जागा नसेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. न्यूज एजेन्सी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भारत देश २०४७ मध्ये विकसीत देश असेल, असं मोदी मुलाखतीमध्ये म्हणाले.

जगाचा जीडीपी केंद्रीत दृष्टीकोण आता मनुष्य केंद्रीत होत आहे. भारत देश यामध्ये महत्त्वाचीआणि मध्यस्त म्हणून भूमिका पार पाडत आहे. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला असल्याचं मोदी म्हणाले. खूप काळ भारताकडे एक अब्ज उपाशी पोटांचा देश म्हणून पाहिलं जात होतं. पण, आता एक अब्ज महत्वाकांक्षी बुद्धीवानांचा आणि दोन अब्ज कौशल्यपूर्ण हातांचा देश म्हणून पाहिलं जात आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया-युक्रेन युद्धाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. दोन देशातील संघर्ष चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर सोडवला जाऊ शकतो याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी केला. भारत सरकारने दोन देशांच्या युद्धामध्ये स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने टीकाही झाली आहे.जी-२० चे भारताला मिळालेले अध्यक्षपद नक्कीच मोठा प्रभाव टाकणारे आहे, असं मोदी म्हणाले. अनेक चांगले प्रभाव जी-२० च्या अध्यक्ष पदामुळे निर्माण झाले आहेत आणि यातील काही माझ्या हृदयाच्या खूप जवळचे आहेत. भारताच्या नेतृत्वामुळे जी-२० केवळ संकल्पाचे व्यासपीठ राहिले नसून भविष्यातील दिशादर्शक ठरले आहे. जागतिक सहयोगासाठी भारताचे प्रयत्न असल्याचं मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

राज ठाकरे यांनी साधला फोनवरून आंदोलकांशी संवाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version