Israel-Hamas युद्धावर प्रियंका गांधी म्हणाल्या, रक्तपात आणि हिंसाचार कधी थांबणार…

सध्या मध्यपूर्वेत अशांतता आहे आणि त्याचे कारण म्हणजे इस्रायल आणि हमास (Israel-Hamas war) यांच्यात सुरूअसलेले युद्ध.

Israel-Hamas युद्धावर प्रियंका गांधी म्हणाल्या, रक्तपात आणि हिंसाचार कधी थांबणार…

सध्या मध्यपूर्वेत अशांतता आहे आणि त्याचे कारण म्हणजे इस्रायल आणि हमास (Israel-Hamas war) यांच्यात सुरूअसलेले युद्ध. हमासने दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर सुरू झालेले युद्ध अजूनही सुरूच आहे. इस्रायलने हमासचा नायनाट करण्यासाठी गाझा पट्टीवर सातत्याने बॉम्बफेक केली असून त्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हमासच्या नियंत्रणाखाली असलेल्या गाझा पट्टीमध्ये लोक मारल्या जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘गाझामध्ये ७००० लोक मारल्यानंतरही रक्तपात आणि हिंसाचाराचे युग थांबलेले नाही. या ७००० लोकांपैकी ३००० निष्पाप मुले होती. असा कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा नाही ज्याचे उल्लंघन झाले नाही. असा कोणताही सन्मान नाही ज्याचे उल्लंघन झाले नाही. असा कोणताही कायदा नाही ज्याची पायमल्ली झाली नाही. त्यांनी विचारले, ‘माणुसकी कधी जागी होणार? इतके जीव गमावल्यानंतर. इतक्या मुलांचा त्याग केल्यावर. माणूस असण्याची जाणीव उरते का? ती कधी अस्तित्वात होती का?’. वास्तविक गाझा पट्टीवर हमासचे नियंत्रण आहे. येथूनच हमास इस्रायलवर हल्ले करतो. इस्रायलवर रॉकेट डागणे ही हमासची हल्ल्याची मुख्य पद्धत आहे. पण यावेळी त्याने गाझाच्या सीमा तोडून आपले सैनिक इस्रायलमध्ये पाठवले, त्यामुळे इस्रायलमध्येही १४०० लोक मरण पावले. इस्रायलनेही गाझा पट्टीतील हमासच्या स्थानांवर बॉम्बफेक करून प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यांचा फटका पॅलेस्टिनींनाही बसला आहे.

इस्रायल-हमास युद्धात भारताने दोन्ही बाजूंना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून नागरिकांचे होणारे मृत्यू थांबतील. भारताने नुकतेच संयुक्त राष्ट्रात म्हटले आहे की, युद्धात मारल्या जाणाऱ्या नागरिकांबद्दल आपण चिंतेत आहोत. वाढत्या मानवतावादी संकटाची आपल्याला तितकीच काळजी असल्याचेही त्यांनी सांगितले. भारताने सर्व पक्षांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले असून चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. गाझा पट्टीतील पॅलेस्टिनींसाठी भारतानेही मदत पाठवली आहे.

हे ही वाचा : 

धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीजेची योग्य तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या

‘लंडन मिसळ’ चित्रपटात भरत जाधव झळकणार हटके भूमिकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Exit mobile version