spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवजयंती साजरी करण्यावरून दिल्लीत JNU मध्ये राडा

दिल्लीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरु विद्यापिठात म्हणजे JNU मध्ये पुन्हा एकदा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांमध्ये हा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्लीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरु विद्यापिठात म्हणजे JNU मध्ये पुन्हा एकदा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांमध्ये हा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवजयंतीनिम्मित आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमध्ये हा वाद झाला. छत्रपती शिवाजी महारांच्या प्रतिमेवरून वाद झाल्यची माहिती मिळत आहे. एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड केल्या आरोप अभाविपच्या विद्यार्थ्यांनी केला. यावरून दोन्ही गट आमने-सामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा अभाविपचा आरोप केला आहे. त्यानंतर ABVP आणि JNU च्या विद्यार्थ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याबाबत विद्यापीठाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान, एनएसयुआयकडून अभाविपचे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. “अभाविपकडून ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे. मात्र, अभाविपने अशी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यापूर्वीच याठिकाणी काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून शिवाजी महाराजांची प्रतिमा हटवण्यात आली”, अशी प्रतिक्रिया एनएनयुआय सचिवांनी दिली.

तसेच यासंदर्भात बोलताना अभाविपचे सचिव उमेशचंद्र अजमेरा म्हणाले, “शिवजयंतीनिमित्त आम्ही स्टुडंट अॅक्टिविटी सेंटर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवली होती. मात्र, एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी ही प्रतिमा बाहेर काढली. तसेच हार कचरापेटीत फेकून दिला.” पुढे बोलताना त्यांनी एसएफआयच्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठातील वातावरण दुषित करण्यात येत असल्याचा आरोपही केला. “एसएफआयच्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठातील वातावरण दुषित करण्यात येत असून विद्यापीठ प्रशासनाने याविरोधात कठोर कारवाई करावी”, अशी मागणी त्यांनी केली.

हे ही वाचा :

Shivjayanti 2023, दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी करायची, एकनाथ शिंदे

Somvati Amavasya 2023, सोमवती अमावस्या म्हणजे काय, काय करावे या दिवशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss