पंजाबमधील आप सरकार करणार, शहीद भगतसिंग यांची जयंती खास पद्धतीने साजरी

पंजाबमधील आप सरकार करणार, शहीद भगतसिंग यांची जयंती खास पद्धतीने साजरी

पंजाब राज्य सरकारने हुतात्मा सरदार भगतसिंग यांची ११५ वी जयंती (२८ सप्टेंबर) वेगळ्या रंगात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. आप सरकारच्या कार्यकाळात पहिल्यांदाच साजरा होणारा शहीद भगतसिंग यांचा जन्मदिन देशभक्तीच्या रंगात रंगविण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. या विशेष दिवसाला अधिक विशेष बनवण्यासाठी राज्य शासनातर्फे राज्यातील विविध भागात राज्यस्तरीय व इतर जिल्हास्तरीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्यभरात धावणाऱ्या सर्व शासकीय व खासगी बसेसमध्ये दिवसभर देशभक्तीपर गीते वाजविण्याची तयारीही करण्यात आली आहे.

परिवहन विभागाने १९ सप्टेंबर २०२२ रोजी लिहिलेल्या पत्रात यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. यानंतर, शासनाच्या आदेशांचे पालन करण्यासाठी, राज्य परिवहन आयुक्तांनी २३ सप्टेंबर २०२२ रोजी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांच्या सचिवांना पुढील पत्रे जारी करून शासनाच्या आदेशांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाचा हा आदेश सर्व शासकीय व खाजगी बसेसना लागू राहणार आहे.

हेही वाचा : 

Shinde vs Thackeray : ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर, शिंदे गटाने निवडणूक आयोगात धाव का घेतली?

आरटीओ गुरुदासपूर गुरमीत सिंग यांनी सांगितले की, त्यांना परिवहन विभागाने जारी केलेले पत्र मिळाले आहे. त्याअंतर्गत पठाणकोट आणि बटाला डेपोच्या महाव्यवस्थापकांना लेखी आदेश देण्यात आले आहेत. शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या भागातील सर्व प्रकारच्या शासकीय व खासगी बसेसमध्ये दिवसभर देशभक्तीची गीते वाजवली जावीत, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक घरात तिरंगा आणि दिवा लावण्याचे आदेश

डीसी हरबीर सिंग यांनी २२ सप्टेंबर रोजी गट विभागाच्या एचओडींसोबत बैठक घेतली आणि त्यांना २८ सप्टेंबर रोजी शहीद सरदार भगतसिंग यांच्या जन्मदिनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्यास आणि घराघरांमध्ये दीपमाळ करण्यास सांगितले. डीसींनी पंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेशही जारी करून लोकांना जागरूक करण्यास सांगितले होते. २८ रोजी शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळी सुरूच राहणार, मत्रीमंडळ बैठकीत निर्णय

Exit mobile version