Rabindranath Tagore Death Anniversary: भारतीय राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?…

Rabindranath Tagore Death Anniversary: भारतीय राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?…

रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी ७ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ साली कोलकात्यात एका संपन्न कुटुंबात झाला व त्यांचा मृत्यू ७ मे १९४१ मध्ये झाला. लहानपणापासूनच रवींद्रनाथ टागोर कविता आणि कथा लिहायचे. साहित्यात त्यांनी दोन हजारहून अधिक कविता रचना केलेल्या आहेत. परंतु रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलांची त्यांनी बॅरिस्टर (Barrister) व्हावे अशी इच्छा होती आणि यासाठी त्यांना १८७८ साली ब्रिटनला (Britain)पाठवण्यात आले होते.

कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या ८ व्या वर्षी पहिली कविता लिहिली. रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यामुळे बंगाली साहित्यात आणि बंगाली संगीतात फार आमूलाग्र बदल घडून आला. तसेच त्यांनी भारतीय उपखंडाच्या संस्कृतीवर मुख्यतः बंगालच्या संस्कृतीवर आपल्या संगीत आणि कलाकृतींद्वारे खोल छाप सोडली आहे.

रवींद्रनाथ टागोर हे एक महान संगीतकार, चित्रकार, लेखक, कवी आणि विचारवंत (Musician, Painter, Writer, Poet and Thinker) मानले जातात. त्यांनी हिंदुस्थानी साहित्य क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळालेले ते पहिले आशियाई होते. त्यांचे तेव साहित्य हे अजूनही सर्वत्र जगभर प्रसिद्ध आहे. त्यांचे साहित्य हे काही चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाची निर्मितीसाठी वापरले आहेत. गोरा, गीतांजली, रक्त कराबी, घरे बैरे, शेषर कोबिता, राजा ओ राणी, ताशेर देश, देना पाओना, शंचयिता ही त्यांची काही उत्कृष्ट कामे आहेत, ज्यापैकी हे अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहेत. त्यांनी भारतासाठी ‘जन गण मन अधिनायक जय हे ‘ (Jan Gan man Adhinayak Jay He) आणि बांगलादेशसाठी ‘अमर शोनार बांग्ला’ (Amar Shonar Bangla)अशी दोन राष्ट्रांची राष्ट्रगीतांची रचना केली .भारत आणि बांगलादेश या दोन देशांचे राष्ट्रगीत लिहिणारे ते एकमेव लेखक आहेत. भारत देशाला सदैवच अश्या अनेक दिगज्ज व्यक्तिमत्वांची मातृभूमी असल्याचा मोलाचा मान मिळालेला आहे.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केला घणाघाती हल्ला, गद्दार, काकांच्या मृत्यूची बघत होते वाट…

Raj Thackeray यांच्या ‘त्या’ व्यक्तव्यावरून मराठा आंदोलक आक्रमक; थेट समोरासमोर बसून केली चर्चा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version