spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IRCTC सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणा कोलमडली

मेक माय ट्रिप ही वेबसाइट तिकीट बुकिंग तसंच ट्रिपच्या नियोजनासाठी खूप लोकप्रिय आहे. इथून तुम्ही केवळ तिकीटंच बुक करु शकत नाही तर हॉटेल, कॅब, ट्रेन, बस आणि फ्लाईट देखील बुक करु शकता.

मेक माय ट्रिप ही वेबसाइट तिकीट बुकिंग तसंच ट्रिपच्या नियोजनासाठी खूप लोकप्रिय आहे. इथून तुम्ही केवळ तिकीटंच बुक करु शकत नाही तर हॉटेल, कॅब, ट्रेन, बस आणि फ्लाईट देखील बुक करु शकता. तुमच्या प्रवासाशी संबंधित जवळपास सर्व सुविधा इथे मिळतील. इथून तुम्ही ट्रेनचं तिकीट बुक करु शकता. नुकतीच एक बातमी समोर आली आहे की, आयआरसीटीसीच्या (IRCTC) अॅप आणि वेबसाईटवरुन रेल्वे तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. आयआरसीटीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने देशभरातील रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणा कोलमडली आहे.

२५ जुलै पहाटे पासून ३.३० वाजल्यापासून हा बिघाड सुरु झाला आहे. याचा परिणाम मुंबईमध्ये देखील दिसून येत आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यूटीएस अॅपमधून (UTS App) तिकीट काढता येत नाही तसेच एटीव्हीएम (ATVM) मशीन द्वारे देखील तिकीट बुकिंग होत नाही. यंत्रणेच्या फायरवॉलमध्ये तंत्रिक बिघाड झाल्याने आरक्षण यंत्रणा बंद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे आयआरसीटीसी कॉर्पोरेट कार्यालयाचे म्हणणे आहे. प्रवासी सुविधेकरता ऑफलाईन आरक्षणसाठी अतिरिक्त तिकीट खिडकी सुरु करण्यात आल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑनलाईन यंत्रणा सुरु झाली नसल्याने मेल-एक्स्प्रेस तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान IRCTC ने आपल्या ट्विटर हँडलवर या तांत्रिक अडचणीची माहिती दिली आहे. IRCTC ने ट्वीट लिहिलं आहे की, ‘तांत्रिक कारणांमुळे तिकीट बुकिंग सेवा उपलब्ध नाही. आमची तांत्रिक टीम ही समस्या दूर करण्यासाठी काम करत आहे. ही अडचण दूर होताच, आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ.” असे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.

हे ही वाचा:

मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता

India vs West Indies चा दुसरा कसोटी सामना अनिर्णित

अखेर Devendra Fadnavis म्हणाले, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री! अजित पवार हे…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss