spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ६५ जणांचा मृत्यू तर…

भारतीय हवामान विभागाने (IMD) हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या अनेक भागांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच या भागांसाठी 'रेड अलर्ट'ही जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या अनेक भागांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच या भागांसाठी ‘रेड अलर्ट’ही जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे सतत पाऊस पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही राज्यात पावसामुळे ६५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन्ही राज्यांमध्ये भूस्खलन, पूर, ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे अनेकांचा बळी गेला आहे. मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे येथील पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनानिमित्त हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सांगितले की, हिमाचलमधील आपत्ती पाहता राज्यात एक साधा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते. सखू म्हणाले की, सोमवारपासून राज्यात भूस्खलन आणि संततधार पाऊस, त्यासंबंधित अपघातांमध्ये सुमारे ५५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हा मृतांचा आकडा वाढू शकतो. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. अडकलेल्या लोकांची सुटका करण्यावर आमचा भर आहे. चंदीगड-शिमला 4-लेन महामार्गासह इतर प्रमुख रस्ते खुले करण्यात आले. तथापि, इतर मार्ग उघडण्यास वेळ लागेल.”

समोर आलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील शिमला येथील दोन भूस्खलनाच्या ठिकाणांवरून आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे . त्याचवेळी मंडी जिल्ह्यात भूस्खलनामुळे २४ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे, जर आपण उत्तराखंडबद्दल बोललो तर, पौरी जिल्ह्यातील नाईट लाइफ पॅराडाईज कॅम्प येथे मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने एकाचा मृत्यू झाला आणि इतर चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एसडीआरएफ) नुसार, काल एका स्थानिकाने पौडी पोलिसांना माहिती दिली की मोहनचट्टीच्या जोगियाना गावात मुसळधार पावसामुळे नाईट लाइफ पॅराडाईज कॅम्पला भूस्खलन झाला आहे. आयएमडीने मंगळवारी सांगितले की डेहराडून, पौरी, टिहरी, नैनिताल, चंपावत आणि उधम सिंग नगरच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये सोमवारी देशातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून १० जण बेपत्ता झाले आहेत. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे आणखी १३ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. तसेच बद्रीनाथ, केदारनाथ आणि गंगोत्री मंदिरांकडे जाणारे रस्ते भूस्खलनामुळे खराब झाले. अशा स्थितीत या तीर्थक्षेत्रांची यात्रा दोन दिवस थांबवावी लागली. पावसामुळे सोमवारी प्रमुख महामार्ग ठप्प झाले. यामध्ये कालका-शिमला, किरतपूर-मनाली आणि पठाणकोट-मंडी आणि धर्मशाला-शिमला मार्गांचा समावेश आहे.इतकंच नाही तर उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये पुन्हा दरड दिसू लागली आहेत, त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे.

हे ही वाचा:

IND vs WI 4th T-20 – टीम इंडियासमोर मालिका जिंकण्याचे आव्हान

प्रत्येक पुरुषांनीही हा चित्रपट पाहायला हवा, राज ठाकरे, १०० रुपये तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss