spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Priya Singh BodyBuilder ‘तिने’ देशाची मान उंचावली, पण स्वत:च्या राज्यात मिळाला नाही सन्मान

राजस्थानची पहिली महिला बॉडीबिल्डर प्रिया सिंग मेघवाल (Priya Singh BodyBuilder) हिने परदेशी भूमीवर सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव उंचावले आहे.

Priya Singh BodyBuilder Rajasthan : राजस्थानची पहिली महिला बॉडीबिल्डर प्रिया सिंग मेघवाल (Priya Singh BodyBuilder) हिने परदेशी भूमीवर सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव उंचावले आहे. ३ वेळा मिस राजस्थान बॉडीबिल्डिंग चॅम्पियन प्रिया सिंग मेघवालने थायलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. प्रिया सिंग मेघवालने देशासाठी गोल्ड मेडल आणलं तिचं सर्व स्तरातून कौतुक देखील झालं आहे. मात्र, सुवर्णपदक जिंकूनही प्रिया निराश आहे.

प्रिया सिंग मेघवालने देशासाठी गोल्ड मेडल आणलं तिचं सर्व स्तरातून कौतुक देखील झालं आहे. परंतु सरकाने तिला कसलीही मदत न केल्याचा ठपका ठेवण्यात येतोय. याचे कारण असे की, भारतात परतताना ती जयपूर विमानतळावर उतरली, तेव्हा सरकारने तिचे स्वागत केले नाही. येथून प्रिया कारने तिच्या घरी आली. प्रिया सिंगच्या या कामगिरीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. सुवर्णपदक जिंकल्यावर त्याचा सरकारने गौरव करायला हवा होता. खरं तर, जयपूरच्या प्रिया सिंग मेघवालने थायलंडमधील पट्टाया येथे झालेल्या ३९व्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या या विजयाने संपूर्ण जगात भारताचे नाव रोशन केले आहे. प्रिया सिंगने आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदक जिंकूनही नरेंद्र मोदी किंवा राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारने तिचा सन्मान केला नाही. थायलंडहून परतल्यानंतर ती एअरपोर्टवरुन घरी एकटीच गेली. एका मुलाखतीमध्ये प्रिया सिंगने जातीवादामुळे भेदभाव होत असल्याचं नमूद केलं आहे.

थायलंड येथील पटाया येथे १७ आणि १८ डिसेंबर २०२२ रोजी ३९ वी आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा होती. या स्पर्धेत राजस्थानची पहिली महिला बॉडीबिल्डर प्रिया सिंगने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तिने सुवर्णपदक आणि प्रो. कार्ड जिंकलं आहे. प्रियाने देशाचं नाव उज्ज्वल केल्याने सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

 सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिया सिंगवर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. प्रिया सिंग ही दलित समाजातील आहे. ‘बाबासाहेबांच्या मुलीने देशाचं नाव उज्ज्वल केलं, देख रहे हो मनू.., गुलामीच्या बेड्या तोडून तिने इतिहास रचला’ अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियामध्ये शेअर केल्या जात आहेत. तसेच राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार राज्यवर्धन सिंह राठोड यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांनी ट्विट करून प्रिया सिंह यांचे अभिनंदन केले, मात्र राज्य सरकारने प्रिया सिंह यांच्याकडे दुर्लक्ष केले. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी ट्विट करुन सरकारने प्रिया सिंगच्या प्रतिभेचा सन्मान केला नसल्याची खंत व्यक्त केली केली आहे. दलित असल्यामुळे प्रियावर अन्याय होत असल्याचा सूर सोशल मीडियामध्ये उमटत आहे. प्रियाने या सगळ्या पोस्ट तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केल्या आहेत.

प्रिया सिंहचे लहानपणीच लग्न झाले होते. ती ८ वर्षांची असताना तिचे लग्न झाले होते. यानंतर तिने पुरुषप्रधान खेळात उतरण्याचा निर्णय घेतला. मग प्रियाने बुरख्यापासून बिकिनीपर्यंतचा प्रवास अनेक कुरुत्यांचा गळा दाबून केला. सुरुवातीला प्रिया जिममध्ये काम करायची. तेव्हाच त्याला बॉडी बिल्डिंगमध्ये रस निर्माण झाला. त्यावर काम करून बॉडी बिल्डिंग सुरू केली. प्रियाने अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्येही भाग घेतला होता. प्रिया २०१८, २०१९ आणि २०२० मध्ये सलग ३ वर्षे मिस राजस्थान बॉडीबिल्डिंग चॅम्पियन बनली. यानंतर आपल्या स्वप्नांना पंख देत तो आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली.

हे ही वाचा:

Niagara Falls पूर्ण गोठला, हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

शिंदे -ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांचा मोठा निर्णय ! मुंबई पालिकेतील सर्व पक्षांची कार्यालय सील

Narendra Modi मुळे व्यावसायिक भरभराट? Gautam Adani म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss