जानेवारीमध्ये Narendra Modi यांच्या हस्ते होणार रामलल्लाची स्थापना

९ नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरच्या (Ram mandir) बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर राम मंदिर बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

जानेवारीमध्ये Narendra Modi यांच्या हस्ते होणार रामलल्लाची स्थापना

९ नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरच्या (Ram mandir) बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर राम मंदिर बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिराची पायाभरणी करण्यात आली. अयोध्येतील राम मंदिराचे काम सध्या जोरात चालू आहे. जानेवारी २०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिरातील रामल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. २१ आणि २३ जानेवारी दरम्यान राममंदिरच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्याला सोन्याचा दरवाजा बसवण्यात येणार आहे. या मंदिराचे काम जानेवारीमध्ये पूर्ण झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी सुरु करण्यात येणार आहे.

अयोध्येतील राम मंदिरचे मुख्य दार सोन्याचे बनवण्यात येणार आहे. या मंदिरात एकूण ४२ दरवाजे बसवण्यात येणार आहेत. मुख्य दार वगळता बाकीचे दरवाजे महाराष्ट्रातील सागवान लाकडापासून तयार करण्यात येणार आहेत. या दरवाजावर सुंदर मोर, चक्र आणि फुलांचं नक्षीकाम करण्यात येईल. लाकडी दरवाज्यांवरही सुंदर नक्षीकाम करण्यात येणार आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern technology) वापर केला जात आहे. राम मंदिर १०० वर्षेपर्यंत अधिक काळ टिकून राहावे म्हणून नवनवीन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. मंदिराच्या आतील आणि बाहेरील भाग संगमरावरी दगडापासून (Marble stone) बनवण्यात येणार आहे. तसेच त्याच्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात येणार आहे. मंदिराच्या बांधणीसाठी खास विटांचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे मंदिरातील तापमान नियंत्रित राहील.

अयोध्येतील राम मंदिराचे काम सध्या जोरात चालू आहे. ३० डिसेंबर २०२३ पर्यंत या कामाचा पहिला टप्पा पूर्ण होण्याची शक्यता आहे. असे राम मंदिर बांधकाम समितीच्या अध्यक्षांनी सांगितले आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर राम मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. डिसेंबर २०२३ मध्ये गर्भगृहाचं काम पूर्ण होईल.

हे ही वाचा: 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली टीका, ज्या हेलिकॉप्टरने गावाकडे जाता…

पुण्यातील गणेश पेठेत लोखंडी सांगाडा कोसळून चार महिला जखमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version