Rani Lakshmibai, काय होते झाशीच्या राणीचे मृत्यूपूर्वीचे विधान?

१९ नोव्हेंबर १८२८ रोजी वाराणसी शहरात ब्राह्मण कुटुंबात राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथी सप्रे. राणी लक्ष्मीबाई ४ वर्षांच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले.

Rani Lakshmibai, काय होते झाशीच्या राणीचे मृत्यूपूर्वीचे विधान?

भारताच्या इतिहासात पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक राणी लक्ष्मीबाई यांना मानले जाते. कवयित्री शुभद्रा कुमारी चौहान यांच्या “झांसी की रानी” या कवितेतील “खूब लडी मर्दानी वो तो झाँसीवाली रानी थी” या ओळी राणी लक्ष्मीबाईच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी सर्वात अचूक आहेत. स्वराज्यासाठी आणि स्वधर्मासाठी लढणारी दुर्गा लढता लढता देवाघरी गेली. त्यावेळी तिचे शेवटचे शब्द होते… ते

”इंग्रजांना माझा देह मिळता कामा नये!”

अर्थात या दुर्गेने आजन्म आपल्या देहाचे, मनाचे, विचारांचे पावित्र्य तर जपलेच शिवाय मृत्यू पश्चातही क्रूरकर्मा इंग्रजांचा आपल्या देहाला स्पर्श होऊ नये याची खबरदारी घेत हितचिंतकांना, सैनिकांना शेवटची आज्ञा फर्मावली ती ही अशी! १८५८ मध्ये ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला ग्वाल्हेरमध्ये इंग्रजांविरुद्ध लढताना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

१९ नोव्हेंबर १८२८ रोजी वाराणसी शहरात ब्राह्मण कुटुंबात राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथी सप्रे. राणी लक्ष्मीबाई ४ वर्षांच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले. राणी लक्ष्मीबाईचे वडील बिथूर जिल्ह्यातील पेशवा बाजीराव द्वितीय यांच्यासाठी काम करत होते आणि ते कल्याण प्रांताचे सेनापती होते. त्यांनी आपल्या कन्येचे नाव ठेवले मणिकर्णिका! लाडाने ते तिला मनु अशी हाक मारत असत. मे १८४२ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी मणिकर्णिका हिचा विवाह झाशीचे राजे गंगाधर नेवाळकर यांच्याशी झाला. त्यानंतरच राणी लक्ष्मीबाई असे तिचे नामकरण करण्यात आले.

हे ही वाचा:

Watch Video, महाकालाच्या दर्शनानंतर Virat – Anushka किर्तन ऐकण्यासाठी पोहोचले लंडनला

घरच्या घरी बनवा Testy Cake

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version