RBI Hike Repo Rate : तुमच्या कर्जाचा EMI वाढणार

भारतीय रिझर्व्ह बँकेने अखेर रेपो दरात वाढ (RBI Hike Repo Rate) केली आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी पत्रकार परिषदेत आरबीआयचे पतधोरण जाहीर केले.

RBI Hike Repo Rate : तुमच्या कर्जाचा EMI वाढणार

भारतीय रिझर्व्ह बँकेने अखेर रेपो दरात वाढ (RBI Hike Repo Rate) केली आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी पत्रकार परिषदेत आरबीआयचे पतधोरण जाहीर केले.

आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोना महासाथ, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जाणवत आहे. जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम जाणवत आहे. महागाईवरील नियंत्रणासाठी व्याज दरात वाढ केली जात आहे. रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय हा पाच विरुद्ध एक अशा बहुमताने घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आरबीआयने रेपो दरात ५० बीपीएस पॉईंट म्हणजे ०.५० टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे आता सामान्यांना सणासुदीच्या काळात ईएमआय वाढीला सामोरे जावे लागणार आहे. त्याशिवाय, नवीन कर्जेदेखील महाग झाली आहेत. आरबीआयच्या व्याज दरवाढीनंतर आता व्याज दर ५.९० टक्के इतका झाला आहे. मागील पाच महिन्यात व्याज दरात १.९० टक्क्यांची वाढ झाली आहे. याआधी व्याज दर ५.४० टक्के इतका होता. आता, व्याज दर ५.९० टक्के इतका झाला आहे.

रेपो रेट म्हणजे काय?

ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते त्या दराला रेपो दर म्हणतात. रेपो दर वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे. तर, रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. याचाच अर्थ आरबीआयने रेपो दरात वाढ केली तर सामान्यांच्या कर्जात वाढ होते.

हे ही वाचा:

PM Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर, आज वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार

Gold-Silver Price: दसऱ्या आधी सोन महागल, जाणून घ्या आजचं दर

Nilesh Rane : विनायक राऊतांच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर म्हणाले, औकातीत राहावं अन्यथा ठाकरेंची इज्जत,अब्रू…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version