Republic Day 2023, प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत ड्रोन आणि पतंग उडवण्यास बंदी

प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2023) राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Republic Day 2023, प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत ड्रोन आणि पतंग उडवण्यास बंदी

प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2023) राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सर्व केंद्रीय सुरक्षा एजन्सी, शेजारील राज्यांचे पोलीस अधिकारी, केंद्रीय सुरक्षा दल आणि इतर विभाग यांच्याशी उत्तम समन्वय साधून दिल्ली पोलिसांनी दहशतवादाच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षेमुळे २६ जानेवारीला दिल्लीत ड्रोन आणि पतंग उडवण्यास बंदी असणार आहे.

उद्या दि २६ जानेवारी रोजी मुंबई, दिल्लीसह संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष हा असणार आहे. अनेक ठिकाणी विविध विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच खबरदारीच्या दृष्टीने पोलीस देखील सतर्क आहेत. म्हणूनच दिल्ली पोलिसांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडला ड्युटीवर उपस्थित राहणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. या ठिकाणी येऊन बसण्याची जागा सकाळी ७ वाजल्यापासून खुली केली जाईल. तसेच यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात लोकांची एंट्री बार कोडद्वारे होणार आहे. तिकीट किंवा पासवर बारकोड टाकला जातो. हे स्कॅन केल्यावर व्यक्तीची पडताळणी केली जाईल. यासोबतच नवी दिल्लीत लोकांच्या सोयीसाठी हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे. हा हेल्पडेस्क २४ तास काम करेल. परिसरातील सर्व उंच इमारती सील करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हवाई वाहने म्हणजे पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा-मोटर, हँग-ग्लायडर्स, UAVs, UAS, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट, हॉट एअर बलून, लहान पॉवर एरियल वाहनांवर दिल्ली पोलिसांनी प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षेसाठी विमान उड्डाण करण्यास बंदी घातली आहे. ही बंदी दिल्ली पोलिसांनी २९ दिवसांसाठी लागू केली आहे. तसेच असामाजिक किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून अशा हवाई वस्तूंचा वापर केल्यास सार्वजनिक व प्रतिष्ठित व्यक्तींच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय दंड संहिता, आयपीसीच्या कलम १८८ अंतर्गत शिक्षा होऊ शकते. तर दिल्ली वाहतूक पोलिसांनी लोकांना कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा क्रियाकलाप दिसल्यास जवळच्या पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे. ड्युटी मार्गावर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या लोकांची गैरसोय कमी करण्यासाठी पोलिसांनी एक अँडव्हायझरी जारी केली आहे.

काय करावे आणि काय करू नये?

Exit mobile version