Republic Day 2023, प्रजासत्ताक दिनानिमित्त गूगलने शेयर केलं सुंदर डुडल

आज भारतात ७४ वा प्रजासत्ताक दिन (74th Republic Day) मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. आज संपूर्ण देशात विविध ठिकाणी देशभक्तीपर आधारित कार्यक्रमांचे आयोजन केलं जाते. तसेच प्रजासत्ताक दिननिमित्त गूगलनेही खास डूडल तयार (Google Doodle) केलं आहे.

Republic Day 2023, प्रजासत्ताक दिनानिमित्त गूगलने शेयर केलं सुंदर डुडल

आज भारतात ७४ वा प्रजासत्ताक दिन (74th Republic Day) मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. आज संपूर्ण देशात विविध ठिकाणी देशभक्तीपर आधारित कार्यक्रमांचे आयोजन केलं जाते. तसेच प्रजासत्ताक दिननिमित्त गूगलनेही खास डूडल तयार (Google Doodle) केलं आहे. सर्च इंजिन गूगलने हे डूडल तयार करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपण जाणून घेऊयात या खास डुडल बाबत.

गूगलच्या या खास डूडलमध्ये एक हातानं डिझाइन केलेलं पेपरकट आर्टवर्क (artwork) दिसत आहे. हे आर्ट वर्क गुजरातच्या गेस्ट आर्टिस्टने तयार केलं आहे. हे पेपरकट आर्ट तयार करणाऱ्या कलाकाराचं नाव पार्थ कोथेकर असं आहे. पार्थनं तयार केलेल्या या पेपरकट आर्टवर्कमध्ये इंडिया गेट, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, सीआरपीएफची मार्चिंग तुकडी आदी दिसत आहे. हे गूगल डूडल डिझाइन पूर्ण केल्यानंतर पार्थ कोथेकरनं त्याच्या भावना व्यक्त केल्या.

एका मुलाखतीत पार्थ ला विचारण्यात आले की, हे डुडल करण्याची संधी तुम्हाला मिळाली तेव्हा काय वाटले? यावर पार्थ म्हणाला माझ्या अंगावर शहारे आले. मी अनेक वेळा गूगलचा ईमेल वाचला कारण माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर मी माझ्या आई आणि बहिणीला याबद्दल माहिती दिली. मला अशी संधी मिळेल असे वाटले नव्हते. पुढे पार्थ म्हणाला, ‘हा पेपर कट पूर्ण होण्यासाठी मला चार दिवस लागले. एका दिवसात मी सहा तास काम करत होतो. मला भारतातील कॉम्पेक्सिटी, त्यांचे परस्परांशी जोडले गेलेले पैलू दाखवायचे होते, याची झलक कलाकृतीच्या कॉम्पेक्सिटीमधून (complexity) दर्शकांना पहायला मिळेल अशी मला आशा आहे. या ड़ूडल आर्टवर्कचा व्हिडिओ गूगल ने त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केला आहे या यामध्ये पार्थ गुगलसाठी डुडल तयार करताना दिसत आहे.

हे ही वाचा:

Republic Day 2023, ‘या’ ठिकाणी पार पडले होते ‘प्रजासत्ताक दिना’चे पहिले संचलन

Republic Day 2023, यंदा बनवा तिरंगा स्पेशल केक

Republic Day 2023, गाडीला तिरंगा लावत आहात? परंतु कोणत्या बाजूने लावतात तुम्हाला माहित आहेत का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version