Republic day 2023, प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदी ठरले लक्षवेधी, केली हि खास गोष्ट

दरवर्षी प्रजास्त्ताक दिनी (Republic Day) लोकांची नजर राष्ट्रीय भवनासमोरील राजपथावर असते. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तेथे ध्वजवंदनासहित अनेक सोहळे पार पडले जातात. या दिनानिमित्त सर्व लोक नवनवीन पोशाख करून येतात. त्यांच्या पोशाखाचे एक वैशिष्ट्य असते.

Republic day 2023, प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदी ठरले लक्षवेधी, केली हि खास गोष्ट

दरवर्षी प्रजास्त्ताक दिनी (Republic Day) लोकांची नजर राष्ट्रीय भवनासमोरील राजपथावर असते. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तेथे ध्वजवंदनासहित अनेक सोहळे पार पडले जातात. या दिनानिमित्त सर्व लोक नवनवीन पोशाख करून येतात. त्यांच्या पोशाखाचे एक वैशिष्ट्य असते. तसेच आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी हे देखील दरवर्षी अनोखा पोशाख करुन येतात. त्यांचा हा पोशाख विविधतेने नटलेला असतो. गेल्या वर्षी ही मोदींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या पोशाखात उत्तराखंड आणि मणिपूरच्या संस्कृतीची झलक दिसत होती. उत्तराखंडची (Uttarakhand) ब्रह्मकमळ टोपी आणि मणिपूरचे लीरम फी स्टोल त्यांनी परिधान केली होती. मोदींच्या या पेहरावानं अनेकांचे लक्ष वेधले होते.

या वर्षीही प्रजास्त्ताक दिनी एक अनोखा पोशाख परिधान केला आहे. मोदी यांनी आज ७४ प्रजासत्ताक दिनानिमित्ताने (74 Republic Day) भारताचे वैविध्य दर्शवणारी बहुरंगीय राजस्थानी पगडी घातली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी नॅशनल वॉर मेमोरियल (National War Memorial) येथे गेले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या या पगडीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यातील विविध रंग हे भारतीय वैविध्याचे प्रतीक आहे असे दिसून येते. मोदींनी परिधान केलेल्या या राजस्थानी बहुरंगी पगडी सोबत क्रिम कलरचा कुर्ता, ब्लॅक जॅकेट, पांढऱ्या रंगाचा स्टोल आणि काळे शूज असा पेहराव केला आहे.

आपल्या भारत देशात सर्व सण एकत्र येऊन साजरे करण्याची परंपरा प्रचीन काळापासून चालत अली आहे. परंतू, काही सण असे आहेत जे प्रत्येक देशवासीयांसाठी सन्मानाचे मानले जातात, ते देशभर आदराने आणि आपुलकीने साजरे केले जातात. २६ जानेवारी आणि स्वतंत्र दिवस हे असेच सण आहेत. जे देशाचे राष्ट्रीय सण (National festival) आहेत .देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा असो, हा दिवस मात्र सर्व देशभक्त एकत्र येऊन साजरा केला जातो . २६जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि देशाला स्वतंत्र संविधान मिळाले .आज प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा:

Republic Day 2023, ‘या’ ठिकाणी पार पडले होते ‘प्रजासत्ताक दिना’चे पहिले संचलन

Republic Day 2023, यंदा बनवा तिरंगा स्पेशल केक

Republic Day 2023, गाडीला तिरंगा लावत आहात? परंतु कोणत्या बाजूने लावतात तुम्हाला माहित आहेत का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version