Republic Day 2023, काश्मिरी खोऱ्यातील कुपवाडामधील महिलांनी तिरंगा तयार करण्याची मोहीम घेतली हाती

Republic Day 2023, काश्मिरी खोऱ्यातील कुपवाडामधील महिलांनी तिरंगा तयार करण्याची मोहीम घेतली हाती

Republic Day 2023 : काश्मीर (Kashmir) म्हटलं की सर्वाना तेथील निसर्ग सौंदर्य (Nature) डोळ्यासमोर येत. पण तेथील लोकांचा विचार केला असता, त्यांच्या विचारांवर दहशतवादाचा पगडा असल्यामुळे भारताचा विरोध आणि भारताचा द्वेष करण्याचा विचार तेथील लोकांमध्ये बिंबवला जातो. म्हणूनच कशमीर हे कायम दहशतवाद आणि दगडफेकीमुळे प्रसिद्धीच्या झोतात होते. पण सध्या कशमीर खोऱ्यात चांगलाच बदल होताना आढळून आले आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात महिलांनी यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तिरंगा बनवण्याची मोहीम हाती घेतली आहे.

वर्षानुवर्षे काश्मीर (Kashmir) मध्ये राहणारे लोक हे भारताचा कायम द्वेष करत आले होते. अनेक वेळा तर कशमीर (Kashmir) मधील स्थानिक लोकांनी तेथे तैनात असलेल्या भारताच्या जवानांवर दगडफेक केली आहे आणि जवानांच्या गाड्यांची तोडफोड करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. अशा प्रकारच्या अनेक बातम्या आतापर्यंत समोर आल्या आहेत. पण सध्याच्या काळात काश्मीर खोऱ्यांमधील लोकांमध्ये कमालीचा बदल घडताना दिसतोय. भारतातील प्रत्येक नागरिकाला ७५ व्या स्वातंत्र्यदिनी तिरंगा (National Flag) घरी आणून तो अभिमानाने फडकावण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) मोहिमेला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहून उत्तर काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यातील महिला आणि तरुणी यांनी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा निश्चय केला आहे.उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात महिलांनी या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तिरंगा बनवण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या तयारी निमित्ताने कुपवाडा जिल्ह्यात या काश्मिरी महिला हाताने राष्ट्रध्वज (National Flag) बनवत आहेत. हा उपक्रम प्रजासत्ताक दिनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा भाग आहे. राष्ट्रध्वज शिवायला मिळाल्यामुळे खूप आनंदी असल्याचे या महिलांनी सांगितले आहे.

प्रत्येक गावातील लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिंग आणि टेलरिंग कला आणि कौशल्ये विकसित करणे हे केंद्राचे उद्दिष्ट आहे. कुपवाडा जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून राष्ट्रध्वजांना मागणी आल्याने सध्या कौशल्य शिकणाऱ्या ३० तरुणी उत्साहाने राष्ट्रध्वज शिवत आहेत. या मुली देशाच्या प्रयत्नांना हातभार लावत आहेत आणि या दुर्गम भागातील घरांसाठी तिरंगा शिवण्यासाठी स्वेच्छेने काम करत आहेत.

हे ही वाचा:

Republic Day 2023, प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत ड्रोन आणि पतंग उडवण्यास बंदी

राशी भविष्य,२५ जानेवारी २०२३, शेअर बाजार , लॉटरी यासारख्या क्षेत्रातून उत्पन्न वाढेल

Maghi Ganesh Jayanti 2023 माघी गणेश जयंतीला बाप्पाला दाखवा पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा तिळाच्या मोदकांचा नैवैद्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version