किंग चार्ल्स यांच्याकडून ऋषी सुनक यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती

किंग चार्ल्स यांच्याकडून  ऋषी सुनक यांची  पंतप्रधान म्हणून नियुक्ती

सोमवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व करण्याच्या स्पर्धेत विजयी झाल्यानंतर किंग चार्ल्स यांनी सुनक यांची यूकेचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. बकिंगहॅम पॅलेसमध्ये राजा चार्ल्स तिसरा यांची भेट घेतल्यानंतर ऋषी सुनक यांची युनायटेड किंगडमचे पंतप्रधान म्हणून अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. किंग चार्ल्स यांनी ऋषी सुनक यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले. बोरिस जॉन्सन आणि लिझ ट्रस यांच्यानंतर सुनक हे दोन शतकांतील देशातील सर्वात तरुण आणि या वर्षीचे तिसरे पंतप्रधान असतील.

किंग चार्ल्स यांच्या भेटीनंतर ऋषी सुनक यांनी १० डाउनिंग स्ट्रीटवरील आपल्या पहिल्या भाषणात सांगितले की, “चुका सुधारण्यासाठी माझी निवड करण्यात आली आहे. मी तुमची नम्रतेने सेवा करण्याचे वचन देतो आणि ब्रिटनच्या लोकांची सेवा करत राहीन. एकत्रितपणे आपण अविश्वसनीय गोष्टी साध्य करू शकतो. आपण सर्व मिळून चांगले भविष्य घडवू.”

ऋषी सुनक म्हणाले की, हे सरकार प्रामाणिकपणा, व्यावसायिकता आणि प्रत्येक स्तरावर जबाबदारीचे असेल. मी तुमचा विश्वास कमावला आहे आणि तो मी कायम राखीन. ब्रिटन हा महान देश आहे, पण देशासमोर गंभीर आर्थिक आव्हान आहेत, यात शंका नाही. पुढे कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत. सध्या आपला देश गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

मंगळवारी लिझ ट्रस यांनी किंग चार्ल्स यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. लिझ ट्रस यांनी केवळ ४५ दिवसातच २० ऑक्टोबर रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून .पुढील चार दिवसात म्हणजेच २४ ऑक्टॉबेरला ऋषी सुनक हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते बनले.त्यांच्या प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डंट टोरी खासदारांकडून पुरेसा पाठिंबा मिळवण्यात अपयशी ठरला. यातच युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जेच्या वाढत्या किमती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची आर्थिक विश्वासार्हता कमी करणारी अर्थसंकल्पीय तूट यासारख्या समस्यांशी ब्रिटनन प्रचंड ग्रासले आहे . तर अश्या परिस्थितीत सुनक यांनी देशाची सत्ता हाती घेतली.

हे ही वाचा :

Kantara: ‘कांतारा’ चित्रपटाने रचले नवे विक्रम; बनला दुसरा सर्वात मोठा कन्नड सिनेमा

Netflix, Hotstar चा फ्री प्लॅन बंद; Vi चा यूजर्सला मोठा झटका

गडचिरोलीमध्ये नियो मेट्रो सुरू करण्यात येणार – देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version