Nirmala Sitharaman : रुपया कमजोर नाही, डॉलर मजबूत होत आहे : निर्मला सीतारामन यांचे विधान

Nirmala Sitharaman : रुपया कमजोर नाही, डॉलर मजबूत होत आहे : निर्मला सीतारामन यांचे विधान

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारतीय रुपयाची घसरण होत नाही, पण डॉलर मजबूत होत आहे. अर्थमंत्री सध्या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टन डीसी येथे पत्रकार परिषदेत त्यांना रुपयाच्या घसरणीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी ही माहिती दिली.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) सर्वोत्तम उपाययोजना करत आहे. पत्रकार परिषदेत अर्थमंत्र्यांना रुपयाच्या घसरणीमुळे आगामी काळात कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे, असा सवाल करण्यात आला.तसेच आणखी घसरणीपासून वाचवण्याचा सरकारचा उद्देश काय, असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा : 

World Food Day 2022: आज जागतिक अन्न दिन, का साजरा केला जातो जागतिक अन्न दिन?

अर्थमंत्री म्हणाले, रुपया घसरत नसून डॉलर मजबूत होत आहे. डॉलरच्या तुलनेत इतर सर्व चलनांची स्थिती सारखीच आहे. चलनाबाबत जास्त अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी RBI सतत प्रयत्न करत असते. आरबीआयच्या प्रयत्नांचा बाजारामध्ये हस्तक्षेप करून रुपयाचे मूल्य सुधारण्याशी संबंधित नाही.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा रुपया डॉलरच्या तुलनेत सर्वकालीन नीचांकी पातळीवर आहे. शुक्रवारी रुपया८ पैशांनी घसरून ८२.३२ रुपये प्रति डॉलरवर बंद झाला. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असताना ही स्थिती आहे. दुसरीकडे, गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ८२. २४ वर बंद झाला होता.

BJP Diwali : दहीहंडी, नवरात्रीनंतर वरळीत भाजपाची हवा, यंदाची दिवाळी जोरात विजेत्यांना देणार लाखोंची बक्षीसं

अर्थमंत्र्यांचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं की, डॉलर मजबूत होण्यापासून आपण कसे रोखू शकतो? दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं की, ‘थंडी वाढत नाही, तर सहनशीलता कमी होत आहे’च्या प्रचंड यशानंतर, रुपयाची घसरण होत नसून डॉलर मजबूत होतोय.

Shahaji Bapu Patil : ‘ह्या’ दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं, भर सभेत शहाजी पाटलांचा दावा

Exit mobile version