spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Russia-Ukrain War: ७५ क्षेपणास्त्रांसह रशियाने चढवला युक्रेनवर हल्ला, पाच जणांचा जागीच मृत्यू

शांतताप्रिय लोकांवर केलेला हा निर्दयी हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली आहे.

युक्रेनला रशियात सामील करून घ्यायच्या पुतीन यांच्या हट्टामुळे गेले कितीतरी महिने युक्रेन आणि रशियामधील संघर्ष सुरू आहे. काही महिन्यात संपुष्टात येईल असं वाटतं असताना आता कितीतरी काळ हा संघर्ष युक्रेन आणि रशियामध्ये सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असणाऱ्या या संघर्षामुळे रोज काहीतरी नवनवीन घटना सातत्याने समोर येत असतात आणि सध्या घडलेली अशीच एक घटना म्हणजे क्रिमिया आणि रशियामधील पुलावर स्फोट घडवल्याच्या रशियाच्या आरोपानंतर आज युक्रेनवर रशियाने क्षेपणास्त्रांनी केलेला हल्ला. या हल्ल्यात ७५ क्षेपणास्त्र रशियाने युक्रेनच्या विविध शहरांवर डागली असून आतापर्यंत या हल्ल्यामुळे ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शांतताप्रिय लोकांवर केलेला हा निर्दयी हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन नागरिकांना झेलेन्स्की यांनी केले आहे. त्यांना आम्हाला पृथ्वीवरूनच पुसून टाकायचे आहे, असे म्हणत झेलेन्स्की यांनी रशियाला सुनावले आहे.

शहरातील अनेक शहरांमध्ये हा हल्ला करण्यात आल्याची माहिती युक्रेनच्या अध्यक्षांच्या कार्यालयाचे उपप्रमुख कायरेलो त्मोशेन्को यांनी दिली आहे. शहरातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचे आव्हान सोशल मीडियावरुन त्मोशेन्को यांनी केले आहे. स्थानिक वेळेनुसार किव्हमध्ये सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. यानंतर शहरात गोंधळ निर्माण झाला असून नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे.

सोमवारी सकाळी किव्हमध्ये पाच स्फोट झाले आहेत. शेवचेन्किवस्क्यी जिल्ह्यामध्ये काही स्फोट झाल्याची माहिती किव्ह शहराचे महापौर विताली क्लित्स्चको यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. रशियाने रविवारीही युक्रेनवर क्षेपणास्त्र डागले होते. या हल्ल्यात लहान मुलासह १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र डागले आहे.

हे ही वाचा:

हनुमान चालिसेला विरोध केल्यामुळे श्रीरामांनीच ठाकरेंकडून धनुष्यबाण हिसकावून घेतला ; रवी राणा

Adani Group : Ambuja, ACC नंतर ही सिमेंट कंपनी खरेदी करणार गौतम अदानी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss