Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला

क्रीमियामध्ये (Crimean Peninsula)झालेल्या स्फोटानंतर रशियाने (Russia) अधिक आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनवर (Ukraine) मोठा हल्ला केला आहे.

Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला

क्रीमियामध्ये (Crimean Peninsula)झालेल्या स्फोटानंतर रशियाने (Russia) अधिक आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनवर (Ukraine) मोठा हल्ला केला आहे. रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रीमियामधील एका पुलावर (Crimea Bridge Blast) स्फोट झाला. रशियाने या स्फोटासाठी युक्रेनला जबाबदार ठरवत त्यांच्यावरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत.

क्रीमियामधील स्फोट आणि लायमन शहरावर युक्रेनने पुन्हा मिळवलेला ताबा यामुळे रशिया अधिक खवळला आहे. मात्र युक्रेनने क्रीमियातील पुलावर झालेल्या स्फोटासंबंधित रशियाने केलेले आरोप फेटाळले आहेत. यानंतर रशियाने युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत. या क्षेपणास्त्रं हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीव्हसह अनेक शहरात मोठं नुकसान झालं आहे.

रशियाने आता युक्रेनवर ७५ क्षेपणास्त्रं डागत (Missile Attack) हल्ला केला आहे. यामध्ये सुमारे ११ जणांचा मृत्यू झाला असून ७० लोक जखमी झाले आहेत. युद्ध सुरु झाल्यापासूनचा युक्रेनवर रशियाने केलेला आतापर्यंतला हा मोठा हल्ला असल्याचं म्हटलं जातं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी १० ऑक्टोबर रोजी रशियाने युक्रेनवर हा मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयालाही लक्ष्य करण्यात आलंय. या क्षेपणास्त्रं हल्ल्याचं मुख्य उद्दीष्ट युक्रेनमधील मुख्य ऊर्जा स्त्रोत आणि ऊर्जा सुविधांचं नुकसान करणं आहे. यामुळे युक्रेनची राजधानी कीव्हसह ऊर्जा स्त्रोत असणाऱ्या दक्षिणेकडील अनेक शहरांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रं डागण्यात आली आहेत.

हे ही वाचा :

सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये, उच्च संस्थांमध्ये हिंदीचा वापर बंधनकारक करा, अमित शाह यांची समितीला शिफारस

चिन्ह आणि नावावर शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि भारत गोगावले यांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version